Afghanistan Flooding  Dainik Gomantak
ग्लोबल

वाळवंट असणाऱ्या देशात अतिवृष्टीमुळे कहर; 31 ठार, अनेकजण बेपत्ता

दैनिक गोमन्तक

रविवारी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील परवान प्रांतात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने कहर कहर माजवला आहे. तालिबानच्या सरकारी वृत्तसंस्थेने सोमवारी वृत्त दिले की मुसळधार पावसामुळे अचानक अफगाणिस्तानमुळे पूर आला होता. ज्यामध्ये उत्तर अफगाणिस्तानमध्ये किमान 31 लोकांचा मृत्यू झाला आणि 12 च्या वर लोक बेपत्ता आहेत. (Heavy rains wreak havoc in Afghanistan 31 dead many missing)

वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या बख्तर वृत्तसंस्थेने म्हटले की, रविवारी उत्तरी परवान प्रांतात पुराचा तडाखा बसला अशी बातमी आहे तसेच सोमवारी किमान 100 लोक बेपत्ता झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे.

परवान प्रांतात, अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या तीन जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 12 घरे वाहून गेली आहेत. हा प्रांत डोंगरांनी वेढलेला आहे आणि अनेकदा मुसळधार पावसाने येथे पूर येतो. स्थानिक हवामान खात्याने सांगितले की, येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानच्या बहुतांश 34 प्रांतांमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशभरात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे जुलै महिन्यात 40 आणि महिन्याभरापूर्वी 19 जणांचा मृत्यू झाला होता. तालिबानच्या राजवटीत विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अफगाणिस्तान सध्या आर्थिक समस्यांना तोंड देत आहे आणि यामुळे आपत्तीनंतर लोकांना मदत करणे अधिक कठीण होते.

विशेष म्हणजे यावेळी मान्सूनमुळे भारत आणि शेजारील देशांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती पाहायला मिळत आहे तसेच पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर लष्करालाही मदतकार्यात उतरावे लागले आहे.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT