Myanmar: आंग सान स्यू की यांना आणखी 6 वर्षांची शिक्षा, आतापर्यंत 17 वर्षांची शिक्षा

Aung San Suu Kyi: म्यानमारच्या पदच्युत नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की यांना सोमवारी आणखी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
Aung San Suu Kyi
Aung San Suu KyiDainik Gomantak

Aung San Suu Kyi: म्यानमारच्या पदच्युत नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान स्यू की (Aung San Suu Kyi) यांना सोमवारी आणखी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी त्यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर 77 वर्षीय स्यू की यांचे समर्थक अधिक आक्रमक होऊ शकतात. खटल्यातील तज्ज्ञांच्या मते, न्यायालयाने त्यांना धर्मादाय संस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

दरम्यान, म्यानमारमधील (Myanmar) सत्तापालटानंतर स्यू की यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्याची ही चौथी वेळ आहे. त्यांना आतापर्यंत एकूण 17 वर्षांची शिक्षा झाली आहे. मंडाले उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायाधीश मिंट सॅन यांनी निकाल देताना सांगितले की, सुकी यांच्यामुळे देशाचे 13 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. डॉ.खिन यांच्या फाऊंडेशनचे मुख्यालय बांधण्यासाठी त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन अत्यंत कमी किमतीत विकली होती, तर महसूल विभागाने त्या जागेची किंमत चढ्या भावाने ठरवली होती, असा आरोप आहे.

Aung San Suu Kyi
Myanmar Armyचा जनतेवर अत्याचार, गावांमध्ये भूसुरुंग टाकल्याने अनेकांचा मृत्यू

दुसरीकडे, राजधानीत आपले घर बांधण्यासाठी सू की यांनी सार्वजनिक देणग्यांचा गैरवापर केल्याचा आरोप जंटाने केला आहे. याशिवाय त्यांनी व्यावसायिकांकडून लाच घेतली आहे. ही लाच त्यांच्या धर्मादाय संस्थेला देणगी म्हणून देण्यात आली होती. सू की यांनी हे सर्व आरोप निराधार असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

Aung San Suu Kyi
Myanmar: लष्करी -नागरी गटात चकमकी!

तसेच, सू की यांच्या आणखी दोन साथीदारांनाही याच आरोपाखाली तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी सु की यांना याच न्यायालयाने (Court) परवानगीशिवाय वॉकी-टॉकी मागवणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, आणि सैन्याविरुद्ध नागरिकांना भडकावणे यासाठी 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सूकी यांच्या वकिलांना मीडियाशी बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com