Queen Elizabeth II Dainik Goamantak
ग्लोबल

श्रीलंकेसह पाकिस्तानच्या देखील महाराणी होत्या एलिझाबेथ द्वितीय

गोमन्तक डिजिटल टीम

ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. एलिझाबेथ यांच्या निधनावर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. एलिझाबेथ यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा परिवार आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या गादीचे वारसदार आहेत.

एलिझाबेथ यांचा 21 एप्रिल 1926 रोजी लंडनमध्ये जन्म झाला. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे 1952 मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. प्रिन्स फिलीप यांच्यासोबत 1947 रोजी एलिझाबेथ यांचा विवाह झाला. मागील वर्षी, 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले.

पण, तुम्हाला माहिती आहे का महाराणी एलिझाबेथ द्वितीय श्रीलंकेसह पाकिस्तानच्या देखील महाराणी होत्या. एलिझाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित केल्यानंतर जवळपास चार वर्षे त्या पाकिस्तानच्या महाराणी होत्या. 23 मार्च 1956 पर्यंत त्या या पदावर होत्या. त्यानंतर पाकिस्तान हा देश पाकिस्तान प्रजाकसत्ताक म्हणून उदयास आला आणि त्यांचे पाकिस्तानवरचे शासन संपृष्ठात आले.

तसेच, त्यावेळचा सिलोन आणि आजचा श्रीलंका या देशावर देखील एलिझाबेथ द्वितीय महाराणी होत्या. याशिवाय एलिझाबेथ या युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, जमैका, अँटिग्वा आणि बारबुडा, बहामास, बेलीझ, ग्रेनाडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेटे, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि तुवालू यासह एकूण 15 देशांच्या राणी होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

Vaibhav Suryavanshi: LIVE सामन्यात वाद! आऊट दिल्यावर 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अंपायरवर भडकला; पुढे काय झालं, पाहा VIDEO

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

SCROLL FOR NEXT