आज हणजूण किनाऱ्यावरील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटवर सरकारी यंत्रणेचा हातोडा पडला. मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाष्य केले असून वादग्रस्त 'कर्लिस' आज जमिनदोस्त केलंच आहे. यापूढे राज्य सरकार ड्रग्ज अन् अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही असे ते म्हणाले.
(CM Pramod Sawant said Goa government will take action against drugs and illegal businesses)
मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली असून दोन आठवड्यात दोन बैठकी घेतल्या गेल्या आहेत. त्यामूळे राज्य सरकार आता अॅक्शन मोडवर आले आहे. आजची बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हणजूणे, येथील अतिक्रमण केलेला भाग पाडावा असे निर्देश न्यायलयाने दिल्याने राज्य सरकार ती कारवाई आज केलीच आहे.
यापूढे ज्या ठिकाणी अशी अवैध बांधकामे, अतिक्रमण केलेल्याचे निश्चित झाले आहे. अशा बांधकामांना ही पाडण्यात येणार आहे. त्यासोबत आणखी काही ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. यावर देखील तातडीने कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही - मुख्यमंत्री
राज्यातील अमली पदार्थ अन् अवैध धंद्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. यासाठी राज्य सरकार पुर्ण प्रयत्न करणार असून या धंद्याना समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्नशिल आहे. तसेच ज्या - ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. अशी माहिती समोर आल्यास तात्काळ अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.