Anjuna Beach: 'कर्लिस' अखेर जमीनदोस्त !

कडक बंदोबस्त; वरिष्ठांची उपस्थिती
anjuna
anjuna Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हणजूण किनाऱ्यावरील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटवर आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले.आज सकाळी अकराच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने सर्व्हे क्रमांक 42/10 ला स्थगिती दिली, हे हॉटल तीन सर्व्हे क्रमांकांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे अन्य दोन सर्व्हे क्रमांकांमधील अतिक्रमण हटवले.

(Controversial 'Curlies' restaurant on Anjuna beach was demolished)

anjuna
Goa Sand Extraction : हायड्रोग्राफी अभ्‍यासाशिवाय रेतीउत्खनन अयोग्‍य

हणजूण किनाऱ्यावर सीआरझेडचे उल्लंघन करून कर्लिस शॅक उभे आहे. सुरूवातीला अत्यंत कमी जागेत असलेले हा शॅक एक रेस्टॉरंट, नाईट क्लबमध्ये रुपांतरीत झाला. यादरम्यान मोठ्या आर्थिक घडामोडी झाल्याची माहिती आहे. याविरोधात 2005 आणि 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने अतिक्रमण केलेला भाग पाडावा असे निर्देश दिले होते.

anjuna
Sonali Phogat हत्येचा मुख्य सुत्रधार अन् हेतू अस्पष्टच; गोवा पोलिस
Curlies restaurant
Curlies restaurantDainik Gomantak

शिवाय हे प्रकरण हरित न्यायालयाकडे गेले होते. या न्यायालयाने तक्रारदाराची बाजू उचलून धरत स्थगिती आव्हान याचिका फेटाळली होती व पंधरा दिवसांत सर्वोच्च न्यायालयात जाण्यास मुभा दिली होती. तत्पूर्वीच प्रशासनाने कारवाई करत अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार वादग्रस्त 'कर्लिस'चे अतिक्रमण पाडण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हांगे यांच्या उपस्थितीत सुरू झालेली ही अतिक्रमण हटाव मोहीम सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर थांबवण्यात आली होती.

मात्र केवळ एका सर्व्हे क्रमांकालाच स्थगिती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमबीर सिंग बिष्णोई अधीक्षक जिवना दळवी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com