Zahid Rameez And PM Modi DAINIK GOMANTAK
ग्लोबल

PM Modi यांच्यावरील टीका भोवली, मालदीवच्या 3 मंत्र्यांचे निलंबन

Ashutosh Masgaunde

Criticism of PM Modi, suspension of 3 Maldivian ministers:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या आपल्याच देशातील नेत्यांना मालदीव सरकारने चांगलाच धडा शिकवला आहे.

मावदीव सरकारने मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान या मंत्र्यांना पदावरून हटवले आहे.

पंतप्रधान मोदींविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या गदारोळानंतर मालदीव बॅकफूटवर आला आणि सरकारने आपल्याच मंत्र्यांवर ही कारवाई केली.

याआधी रविवारी दुपारी मालदीव सरकारने एक निवेदन जारी केले होते की, 'मालदीव सरकारला परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांबद्दल माहिती आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

मालदीव सरकारचा असा विश्वास आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही आणि जबाबदारीने आणि द्वेष, नकारात्मकता पसरवणार नाही किंवा मालदीव आणि त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यातील घनिष्ठ संबंधांना अडथळा आणणार नाही अशा पद्धतीने केले पाहिजे. शिवाय अशा अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाचे संबंधित अधिकारी मागेपुढे पाहणार नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने कठोर भूमिका घेत मालदीव सरकारच्या मंत्र्याचे विधान आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आणि मुइज्जू सरकारवर आवाज उठवला आहे.

मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी राजधानी माले येथे आपला आक्षेप नोंदवला आणि मालदीव सरकारकडे हे प्रकरण मांडले.

भारत सरकारने घेतलेल्या आक्षेपानंतर मालदीव सरकारमध्ये घबराट पसरली आहे. मालदीव सरकारने एक निवेदन जारी केले आणि मंत्र्यांच्या टिप्पण्यांपासून स्वतःला दूर केले आणि त्यांना वैयक्तिक म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT