'भारतासारखा विश्वासू मित्र मिळणे भाग्याची गोष्ट', बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची निवडणुकीदरम्यान स्तुतीसुमने

India-Bangladesh: 1975 च्या हत्याकांडाची भीषणता आठवून त्या म्हणाल्या की, त्या घटनेत माझ्या कुटुंबाची हत्या झाली होती. त्यावेळी भारताने मला पाठिंबा दिला आणि मी अनेक वर्षे दिल्लीत राहिली.
Bangladesh Prime Minister Sheikh Haseena
Bangladesh Prime Minister Sheikh Haseena Dainik Gomantak
Published on
Updated on

'It's a matter of luck to have a loyal friend like India', praises Bangladesh Prime Minister Sheikh Hasina during elections:

हिंसाचार आणि बहिष्काराच्या दरम्यान बांगलादेशात रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्ष बांगलादेश अवामी लीगचा विजय निश्चित मानला जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजधानी ढाका येथील एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. निवडणुकीच्या काळात त्यांनी भारताचे भरभरून कौतुक करून मोठा संदेश दिला.

बांगलादेशला भारतासारखा विश्वासू मित्र मिळणे खूप भाग्याची गोष्ट आहे, असे पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या. भारत हा नेहमीच बांगलादेशचा विश्वासू मित्र राहिला आहे.

बांगलादेश मुक्तिसंग्रामाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या की, 1971 साली भारताने आपल्या देशाला पाठिंबा दिला होता. 1975 मध्ये आम्ही आमचे संपूर्ण कुटुंब गमावले, त्यावेळीही भारताने आम्हाला मदत केली होती.

Bangladesh Prime Minister Sheikh Haseena
संतापजनक! पाकिस्तान-बांग्लादेश झिंदाबादच्या घोषणा देत प्रोफेसरची मुस्लीम धर्मियांसाठी वेगळ्या देशाची मागणी

1975 च्या हत्याकांडाची भीषणता आठवून त्या म्हणाल्या की, त्या घटनेत माझ्या कुटुंबाची हत्या झाली होती. त्यावेळी भारताने मला पाठिंबा दिला आणि मी अनेक वर्षे दिल्लीत राहिली. यावेळी शेख हसीना यांनी लोकशाहीचे महत्त्वही सांगितले.

शेख हसीना म्हणाल्या की, आमच्या सरकारने देशात लोकशाही अधिकार प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. ही लोकशाही भविष्यातही कायम राहील. त्यामुळेच आज मतदानासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. त्यांनी बांगलादेशातील मुख्य पक्ष बीएनपीवर देशात हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आणि म्हणाल्या की, त्यांना देशाच्या विकासात अडथळा आणायचा आहे.

Bangladesh Prime Minister Sheikh Haseena
'आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक', मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर मालदीवच्या सत्ताधारी नेत्याची खोचक टीप्पणी

निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था

127 देशांतील निरीक्षक आणि 73 पत्रकार बांगलादेशच्या निवडणुका कव्हर करण्यासाठी अधिकृतपणे बांगलादेशमध्ये आहेत.

बांगलादेशमध्ये रविवारी 12व्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. बीएनपीसह सर्व विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. काळजीवाहू सरकारच्या देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात, अशी विरोधी पक्षांची मागणी होती, मात्र शेख हसीना सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

याच्या निषेधार्थ विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळेच बांगलादेशात हिंसक घटना घडत असून हिंसाचार पाहता निवडणुकीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com