आशिया खंडात वर्चेस्व निर्माण करण्यासाठी चीन कर्ज जाळे (Debt Trap), बेल्ट अॅन्ड रोड इन्शिएटिव्ह (BRI) यासारख्या धूर्त धोरणांचा वापर करत आहेत. भारताचे शेजारी पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदीव (Srilanka, Pakistan And Maldives) हे देश चीनच्या या धोरणांचे शिकार ठरले आहेत. सध्या या तिन्ही देशांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे. फोर्ब्स मासिकाने देखील श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव पूर्णपणे चिनी कर्जाच्या गर्तेत अडकल्याचे म्हटले आहे. (Sri Lanka, Pakistan, Maldives stand neck-deep in Chinese debt: Forbes)
श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव या देशांनी चीनकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. पाकिस्तानवर चीनचे 77.3 अब्ज डॉलर एवढे कर्ज आहे. मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 31 टक्के चीनचे कर्ज या देशावर आहे. फोर्ब्सने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एवढेच नव्हे तर, जगातील 97 देशांवर चीनचे कर्ज आहे. यामध्ये आफ्रिकेतील, मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि पॅसिफिक भागातील देशांचा समावेश आहे.
चीन विविध देशात बंदरे विकसित करणे, रेल्वे प्रकल्प तसेच जमीनीवर देखील अनेक प्रकल्प विकसित करत आहे. यामाध्यामातून चीन छोटी अर्थव्यवस्था असलेल्या देशांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव यासह अंगोला, इथिओपिया, केनिया या देशांवर देखील चीनचे भलमोठ्ठ कर्ज आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.