china  Dainik Gomantak
ग्लोबल

China Viral News: टांगा पलटी घोडे फरार! लग्नात आल्या अर्धा डझन गर्लफ्रेन्ड अन् नवरी पण...

महिलांनी एका मोठ्या बॅनरवर 'आम्ही चेनच्या एक्स गर्लफ्रेंड आहोत, आज आम्ही तुम्हाला संपवू,' असे लिहिले होते.

Pramod Yadav

चीनमध्‍ये एका मुलाचे लग्‍न सुरू होते, यावेळी मुलींच्या एका गटाने मॅरेज हॉलजवळ विरोध सुरू केला. विशेष बाब म्हणजे, या सर्व मुली मुलाच्या एक्स गर्लफ्रेन्ड असल्याचे समोर आले असून, त्यांनी मुलाच्या लग्नाला विरोध केला आणि लग्न सोहळा बंद करण्यास सांगितले व धमक्याही दिल्या.

दक्षिण-पश्चिम चीनच्या युनान प्रांतात राहणाऱ्या चेन नावाचा हा व्यक्ती आहे. महिलांनी एका मोठ्या बॅनरवर 'आम्ही चेनच्या एक्स गर्लफ्रेंड आहोत, आज आम्ही तुम्हाला संपवू,' असे लिहिले होते.

चेनचे सोमवारी, 6 फेब्रुवारी रोजी लग्न होते, त्या ठिकाणी अर्धा डझनहून अधिक मुलींचा एक गट आला आणि त्यांनी विवाह मंडपासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या व्हिडिओमध्ये स्त्रिया लाल रंगाचे मोठे बॅनर घेऊन लग्नमंडपाबाहेर रस्त्याच्या मधोमध उभ्या असल्याचे दिसत आहे.

मुलींनी केलेला विरोध लग्नातील काही पाहुण्यांच्या लक्षात आला, ते मुलींभोवती जमले आणि काय चालले आहे ते विचारू लागले. या घटनेमुळे मला खूप लाज वाटली, आता माझी पत्नी माझ्यापासून वेगळे होण्याचा विचार करत आहे. या घटनेने वधू आणि तिचे पालक हादरले आहेत. असे चेनने मीडियाला सांगितले.

दरम्यान, चेनने सांगितले की महिलांच्या प्रतिक्रियेमुळे तो नाराज झाला नाही आणि त्याने कबूल देखील केले की तो पूर्वी एक वाईट बॉयफ्रेंड होता.

मी लहान वयात असताना परिपक्व नव्हतो आणि मी अनेक मुलींना दुखावले आहे. चेनने त्याच्या भूतकाळातील रोमँटिक प्रवासाबद्दल तपशीलवार वर्णन केले नाही, परंतु त्याने आपल्या माजी मैत्रिणींशी जे काही केले त्याबद्दल त्याला खेद वाटत असल्याचे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Abhinav Tejrana: तेजराणाची 'तेजस्वी' कामगिरी! रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 651 धावा; IPL संघ 'या' खेळाडूवर डाव लावणार?

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

SCROLL FOR NEXT