दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदचे अधिवेशन आज संपन्न झाले. या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. अल्लाह आणि ओम एक असल्याचे वक्तव्य अर्शद मदनी यांनी केले आहे
मौलाना सय्यद अर्शद मदनी यांच्या वक्तव्यावरून मंचावर गदारोळ झाला व संतप्त झालेले इतर धर्मगुरू मंचावरून पायउतार झाले.
जमियत उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रमात बोलताना उलेमाचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी म्हणाले, "मी धर्मगुरूंना विचारले की, जेव्हा कोणीही नव्हते, ना श्रीराम, ना ब्रह्मा, तेव्हा मनूने कोणाची पूजा केली? काही लोक म्हणतात की त्यांनी ओमची पूजा केली, मग मी म्हणालो की आपण त्याला अल्लाह म्हणतो, काही जण ईश्वर, पर्शियन बोलणारे त्याला खुदा आणि इंग्रजी बोलणारे त्याला गॉड म्हणतात."
दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी उलेमाचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद होण्याची शक्यता आहे. मदनी यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या संत निषेध करत मंचावरून पायउतार झाले.
मौलाना मदनी म्हणाले, 'हजरत आदम जे पैगंबर होते, ते भारताच्या मातीत प्रथम अवतरले होते. त्याला हवे असते तर त्याने अॅडमला आफ्रिका, अरबस्तान, रशियामध्ये देखील उतरवले असते. त्यांना हेही माहीत आहे, आदमला जगात आणण्यासाठी भारताची भूमी निवडण्यात आली, हेही आम्हाला माहीत आहे.
"मी मोठ्या धार्मिक नेत्यांना विचारले की अल्लाहने पृथ्वीवर ज्याला पहिला मनुष्य पाठवला तो कोणाची पूजा करतो. जगात फक्त आदम होता, त्याला काय म्हणावे? लोक वेगवेगळी मते मांडायचे. धर्मगुरू म्हणाले की आम्ही त्याला मनू म्हणतो, त्याला अॅडम म्हणतो, इंग्रजी भाषिक लोक त्याला अॅडम म्हणतात. आदमच्या मुलांना आपण माणूस म्हणतो आणि ते मनुच्या मुलांना मानव म्हणतात." असे मदनी म्हणाले.
दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांच्या भाषणानंतर व्यासपीठावर उपस्थित आचार्य लोकेश मुनी (जैन मुनी) यांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही त्यांच्या (अर्शद मदनी) विधानाशी सहमत नाही." असे मदनी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.