Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Shocking: क्रूरतेचा कळस! चिमुकल्याला वारंवार जमिनीवर आपटून नराधमानं घेतला जीव, अंगावर काटा आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद VIDEO

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली. एका नराधमाने एका निष्पाप चिमुरड्याची अत्यंत अमानुषपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, एका महिलेवरील एकतर्फी प्रेमातून या नराधमाने हा सूड उगवल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घटनेचा एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. आरोपीला तात्काळ आणि कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आरोपीची क्रूरता स्पष्टपणे दिसून येते. तो त्या लहान मुलाला अत्यंत निर्दयीपणे उचलून पुन्हा-पुन्हा जमिनीवर आदळताना दिसत आहे. 'डेडली क्लेश' नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, जो काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की, तो पाहिल्यानंतर लोकांच्या मनात तीव्र संताप आणि दुःख निर्माण झाले. या घटनेमुळे लहान मुलांविरोधातील वाढते हिंसक गुन्हे आणि अशा प्रकरणांमध्ये न्याय मिळण्यास होणारा उशीर यावर पुन्हा एकदा नवीन वाद आणि चर्चा सुरु झाली.

बाल शोषणाच्या आणि हिंसेच्या अशा घटनांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते ऑनलाइन प्रसारित केले जाण्याबद्दलही लोकांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

या संतापजनक प्रकारानंतर सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी आरोपीविरुद्ध कमालीचा संताप व्यक्त करत, त्याला भरचौकात कठोर आणि अद्दल घडवणारी शिक्षा देण्याची मागणी केली. समाजमन सुन्न करणाऱ्या या कृत्याबद्दल लोकांच्या भावना अनावर झाल्या. दुसऱ्या एका युजरने या कृत्याला अमानुषतेचा कळस म्हणत मुलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरणाऱ्या यंत्रणेवर टीका केली. तसेच, पीडित कुटुंबाला त्वरित न्याय देण्याची विनंती केली.

तसेच, अनेकांनी याला 'शुद्ध सैतानी कृत्य' असे संबोधत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले. आणखी एका युजरने लोकांना आवाहन केले की, अशा प्रकारच्या अत्यंत विचलित करणाऱ्या हिंसक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे, तसेच हे दृश्य मुलांसाठी आणि संवेदनशील मनाच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरु शकत असल्याने ते ब्लर करण्यात यावे.

हा सर्व प्रकार ऑनलाइन जगतात प्रचंड चर्चेचा विषय बनला असून, या घटनेने लोकांच्या मनाल सु्न्न केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या अमानुष हत्येचा तपास कुठेपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी आरोपीविरुद्ध काय पावले उचलली, याबाबत अद्याप प्रशासनाकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले असून गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी, अशी एकच मागणी सध्या जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT