Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

21 Year Boy Cancer Viral Story: एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या दुर्धर कर्करोगाच्या लढ्याबद्दल केलेली हृदयद्रावक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Manish Jadhav

21 Year Boy Cancer Viral Story: आयुष्याच्या ऐन विशीत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या दुर्धर कर्करोगाच्या (Cancer) लढ्याबद्दल एक हृदयद्रावक पोस्ट केली. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या भावनिक पोस्टमुळे लोकांचे मन हेलावून गेले असून त्याला हजारो प्रार्थना आणि आधार देणारे मेसेज येत आहेत.

'R/TwentiesIndia' नावाच्या 'रेडिट' (Reddit) ग्रुपवर या तरुणाने ही पोस्ट शेअर केली. 2023 मध्ये त्याला स्टेज 4 कोलोरेक्टल कॅन्सरचे निदान झाले. महिनोन-महिने केमोथेरपी आणि रुग्णालयात राहिल्यानंतर आता डॉक्टरांनी उपचाराचे सर्व मार्ग संपल्याचे सांगितले. तो कदाचित हे वर्षही पूर्ण जगू शकणार नाही, असा निराशाजनक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.

'ही शेवटची दिवाळी असेल'

उद्या म्हणजेच (17 ऑक्टोबर) शुक्रवारपासून दिवाळी सुरु होणार असून आयुष्यातील हा शेवटचा प्रकाशोत्सव असेल या कल्पनेने त्याला होणारे दुःख त्याने व्यक्त केले आहे. "लवकरच दिवाळी येत आहे आणि रस्त्यांवर दिवे लागायला सुरुवात झाली आहे. हे दिवे मी शेवटचे पाहीन हे जाणून घेणे खूप कठीण आहे. मला या दिव्यांची रोषणाई खूप आठवेल. माझे आयुष्य हळू हळू संपत असताना जगाकडे पाहत राहणे खूप विचित्र वाटतेय. मला माहित आहे की, पुढच्या वर्षी माझ्या जागी दुसरे कोणीतरी पणत्या लावेल, आणि मी फक्त एका आठवणीत जिवंत राहीन," असे त्याने लिहिले.

प्रवासाला जाणे, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करणे यांसारखी अनेक स्वप्ने अपूर्ण राहिल्याची खंतही त्याने बोलून दाखवली. मर्यादित वेळेची आठवण होताच ही स्वप्ने दूर जात असल्याचे त्याला जाणवत आहे.

पोस्टच्या शेवटी त्याने लिहिले, "मला आठवण येते की माझा वेळ संपत आहे आणि तो विचार विरुन जातोय. मी आता घरी असून माझ्या पालकांच्या चेहऱ्यावरचे दुःख मला स्पष्टपणे दिसत आहे. मला नक्की माहित नाही की मी ही पोस्ट कशासाठी करत आहे. कदाचित, मी शांतपणे पुढे काय आहे यात विलीन होण्यापूर्वी आपली एक छोटीशी खूण मागे सोडण्यासाठी हे सर्व मोठ्याने बोलून दाखवत आहे."

चमत्कारासाठी प्रार्थनांचा वर्षाव

दरम्यान, या भावूक पोस्टने रेडिटवर हजारो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. अनेकांनी त्याचे दुःख वाटून घेतले आणि त्याला 'चमत्कार' घडावा यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्याला आयुष्यातील साध्या आनंदाचे मोल जपण्याचे आवाहन केले. काहींनी त्याला शक्ती आणि धैर्य ठेवण्याचा सल्ला दिला, तर काहींसाठी ही पोस्ट जीवन किती नश्वर आहे, याची आठवण करुन देणारी ठरली.

एका युजरने लिहिले, "मला आशा आहे की एक चमत्कार होईल आणि तुझा कॅन्सर पूर्णपणे बरा होईल! धीर धरा मित्रा. त्याचवेळी, तुझ्याकडे जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त आनंद घे. छान संगीत ऐक, कुटुंबासोबत वेळ घालव. तू लढत आहेस हीच मोठी ताकद आहे."

दुसऱ्या एका युजरने "मला स्वप्ने होती, तुम्हाला माहित आहे?" ही ओळ वाचून मन हेलावले, असे सांगत, "जोपर्यंत खेळ संपत नाही, तोपर्यंत तो संपलेला नसतो," अशी सकारात्मकता दिली.

तिसऱ्या युजरने "तुझा मेसेज खूपच भावनाप्रधान आहे. तुझ्या पुढील प्रत्येक क्षणासाठी प्रेम आणि प्रकाशाची इच्छा आहे," असे म्हटले. या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे या तरुणाला लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना मिळत आहेत.

चौथ्या युजरने लिहिले, "भाऊ, मी तुम्हाला ओळखत नाही, पण हे वाचून मन हेलावले. तुम्ही म्हणाले की कदाचित या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जिवंत नसाल आणि दिवाळी साजरी करु शकणार नाही, हे खूप कठीण आहे. तुम्ही अजूनही लढत आहात, हेच तुमची प्रचंड ताकद दर्शवते. तुम्ही मनाप्रमाणे उत्सव साजरा करु शकला नाही तरी, अनेक लोक तुमचा विचार करत आहेत. मजबूत राहा, भाऊ."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT