The young man returned home alive after 8 days, of cremation in Uttar Pradesh. 
देश

अंत्यसंस्कारानंतर 8 दिवसांनी तरुण जिवंत घरी परतला, लोक म्हणाले...

Ashutosh Masgaunde

The young man returned home alive after 8 days, of cremation in Uttar Pradesh:

एखाद्यावर अंत्यसंस्कार झाले आणि ती व्यक्ती जिवंत असल्याची बातमी आली, तर सर्वांनाच धक्का बसणे स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये, असेच काहीसे घडले, जिथे एक कुटुंबांने त्यांच्या मुलावर अंतिम संस्कार केले होते. परंतू त्यांता मुलगा 8 व्या दिवशीच घरी परतला.

जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला पाहून त्याच्या कुटुंबीयांना आश्चर्य वाटले. पण इतर तो भूत आहे असे समजून पळून जाऊ लागले.

दरम्यान, या तरुणाच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि मुलाला जिवंत पाहून तिला आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

खरं तर झालं असं की, ज्या व्यक्तीवर त्यांनी अंत्यसंस्कार केले तो त्यांचा मुलगा नसून दुसरा कोणीतरी होता, जो त्यांच्या मुलासारखाच दिलस होता.

सहारनपूरच्या बारगाव गावातील चंद्र प्रजापती यांच्या कुटुंबाला तीन मुले आहेत, त्यापैकी प्रमोद कुमार हा दुसरा मुलगा आहे.

29 जानेवारी रोजी प्रमोद हरिद्वार येथील ढाब्यावर नोकरीला चाललोय असे सांगून घरातून निघून गेला होता. त्यानंतर 31 जानेवारी रोजी मुझफ्फरनगरमधील मृत तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रमोदला फोन केला असता तो फोनही उचलत नव्हता, यामुळे कुटुंबीयांनी मृत तरुणाला आपला मुलगा म्हणून स्वीकारले.

कुटुंबीय फोटोसह मुझफ्फरनगर शवागारात पोहोचले आणि मृतदेहाची ओळख प्रमोद म्हणून केली. हा त्यांचा मुलगा असल्याचे कुटुंबीयांनी मान्य केले. त्याच्या हातावर आणि डोळ्यांवर खुणा पाहून कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवली.

याशिवाय मृत तरुणाच्या हातावर पीके नावाचा टॅटूही होता. कुटुंबीयांना वाटले की हे मुलानेच केले असावे, त्यानंतर त्यांनी मृतदेह गावात आणला आणि शोकाकुल वातावरणात कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

यानंतर 5 फेब्रुवारीला विधी होणार होत्या, मात्र प्रमोद कुमार अचानक घरी आला आणि त्याला पाहून सर्वजण 'भूत...भूत' म्हणून ओरडायला लागले. एका दुकानदारानेही त्याला भूत समजून त्याला कोल्ड ड्रिंक देण्यास नकार दिला आणि पळ काढला.

प्रमोद जिवंत असल्याची बातमी गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ही बातमी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच तेही त्याला पाहण्यासाठी धावले.

प्रमोदचे कुटुंबीय त्याला घरी घेऊन गेले तेव्हा गेल्या सात दिवसांपासून सतत रडत असलेली त्याची आई बोहाटीदेवी यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मात्र, हा मृतदेह कोणाचा होता, याची ओळख पटू शकली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT