Chocolate Day ची ऐशी तैशी! चॉकलेट डे दिवशीच डेअरी मिल्कमध्ये सापडली अळी, पहा व्हिडिओ

Dairy Milk Viral Video: "ही एक गंभीर समस्या आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही," असे एका यूजरने लिहिले. तर काही यूजर्स म्हणत आहेत, तो कॅडबरीचा नवीन फ्लेवर आहे.
Cadbury Dairy Milk Viral Video
Cadbury Dairy Milk Viral Video X, @RobinZaccheus

A person shared a video on X claiming that a Cadbury Dairy Milk bought from a shop in Hyderabad was infested with worm:

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, त्यामुळे लोक रोज काही ना काही करून आपल्या प्रिय व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण कधी कधी तुम्ही चांगले करायला जात असता तेव्हा तुम्हाला कधी कधी मान खाली घालायला लावणारे प्रसंग घडतात. असेच काहीसे हैदराबादमधील एका व्यक्तीसोबत घडले.

एका व्यक्तीने सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, त्याने तेलंगणामध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी एका दुकानातून कॅडबरी खरेदी केली होती. मात्र त्यामध्ये अळी अढळ्याचा दावा त्याने एक व्हिडिओ शेअर करत केला आहे.

संबंधीत व्यक्तीने चॉकलेटचा व्हिडिओही शेअर केला आहे ज्यावर एक अळी रांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहताच लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर 85 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

"ही एक गंभीर समस्या आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही," असे एका यूजरने लिहिले. "त्यांच्यावर खटला चालवा आणि नुकसानभरपाईचा दावा करा," असे दुसरा एक यूजर म्हणाला.

तर काही यूजर्स म्हणत आहेत, तो कॅडबरीचा नवीन फ्लेवर आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेनेही या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. "संबंधित फूड सेफ्टी पथकाला याबाबत माहिती दिली असून, लवकरच याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल," असे म्हटले आहे.

कॅडबरी डेअरी मिल्कनेही या पोस्टला प्रतिसाद दिला आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या खरेदीबद्दल अधिक तपशील देण्याची विनंती केली.

"हाय, मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे कॅडबरी इंडिया लिमिटेड) आपल्या उत्पादनांचा दर्जा उच्च राखण्याचा प्रयत्न करते. पण तुम्हाला एक कटू अनुभव आला याचा आम्हाला खेद वाटतो. तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीचे तपशील द्यावा," अशी प्रतिक्रीया कॅडबरी डेअरी मिल्कने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com