'ज्ञानवापी मशीद तात्काळ खाली करा', योगींना बंगालमध्ये घेरण्याचा TMC नेत्याचा इशारा

मशिदींमधील 'पूजे'वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कोलकाता येथील जमियत उलेमा-ए-हिंदच्या रॅलीत चौधरी सहभागी झाले होते.
Gyanvapi mosque in Varanasi| Yogi And siddiqullah chowdhury
Gyanvapi mosque in Varanasi| Yogi And siddiqullah chowdhury
Published on
Updated on

Gyanvapi mosque in Varanasi

ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण तळघरातील मूर्तींसमोर प्रार्थना करण्यास वाराणसी न्यायालयाने परवानगी दिली. यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते सिद्दीकुल्ला चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बंगालमध्ये आल्यानंतर घेरण्याचा इशारा दिला आहे.

तसेच, हिंदू उपासकांना ज्ञानवापी मशीद तात्काळ खाली करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

मशिदींमधील 'पूजे'वर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कोलकाता येथील जमियत उलेमा-ए-हिंदच्या रॅलीत चौधरी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना अशा गोष्टींना परवानगी देण्याचा कोणता अधिकार आहे? असा सवाल त्यांनी केला.

आदित्यनाथ बंगालमध्ये कुठे बसले तर त्यांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही, असे चौधरी म्हणाले. हिंदू उपासकांनी जबरदस्तीने तेथे पूजा करण्यास सुरुवात केली आहे. ज्ञानवापी मशीद त्वरित खाली करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आम्ही कोणत्याही मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात नाही. मग ते पूजा करण्यासाठी ते मशिदीत का येत आहेत. कोणी मशिदीचे रुपांतर मंदिरात करु पाहत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे होऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाले.

ज्ञानवापी मशीद 800 वर्षापासून त्याजागी आहे, ते जमीनदोस्त कसे करु शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चौधरी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह टीएमसी सुप्रीमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल सरकार विशिष्ट समुदायाचे संरक्षक बनले आहेत, अशी टीका केली.

रोहिंग्यांसाठी त्यांच्याकडे रेड कार्पेट आहे... योगी आदित्यनाथ हे सनातनी पुत्र आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्याने योगी आदित्यनाथ यांना अशाप्रकारे धमकावणे मान्य नाही. योगींना बंगालला जाण्यापासून रोखण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असे गिरीराज सिंह म्हणाले.

वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या 31 जानेवारीच्या आदेशाविरुद्ध ज्ञानवापी मशीद समितीच्या याचिकेवरील सुनावणीसाठी 15 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात मूर्तींसमोर प्रार्थना केली जाऊ शकते असा निर्णय दिल्यानंतर दोन दिवसांनी चौधरी यांनी हा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com