rohit sharma virat kohli gautam gambhir Dainik Gomantak
देश

Rohit Sharma: रोहित शर्माचं 'काऊंटडाऊन' अ‍ॅडलेड कसोटीनंतरच सुरु झालं होतं! त्याचं नसणं कोणाच्या हिताचं?

Rohit Sharma And Virat Kohli Test Retirement: बीसीसीआय आणि अनेक मोठ्या माजी क्रिकेटपटूंनी इंग्लंड दौऱ्यापर्यंत विराटला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. आता एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान विराट कोहलीला पुन्हा एकदा कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याचे संकेत देण्यात आले होते.

Manish Jadhav

हिटमॅननंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करुन चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्याने सोशल मीडियावीरल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित-विराटच्या अशा अचानक निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीवरुन रोहित-विराटला टीकेचा सामना करावा लागला होता. आपल्याला आणखी कसोटी क्रिकेट खेळायचे असल्याचे देखील रोहितने बोलून दाखवले होते. मात्र तसे होऊ शकले नाही. रोहित-विराटच्या निवृत्तीमागे अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. आता असे मानले जाते की, टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला संघावर पूर्ण नियंत्रण हवे आहे.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय (BCCI) आणि अनेक मोठ्या माजी क्रिकेटपटूंनी इंग्लंड दौऱ्यापर्यंत विराटला कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. आता एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान विराट कोहलीला पुन्हा एकदा कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याचे संकेत देण्यात आले होते. पण नंतर परिस्थिती बदलली आणि कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला.

विराटच्या अचानक कसोटी निवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित

विराटने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्या निवृत्तीमागील खरे कारण काय आहे? कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर तो नाराज होता का? की आणखी काही कारणामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला? अशा प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत, परंतु काही रिपोर्ट आणि माजी क्रिकेटपटूंच्या वक्तव्यांमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कोहलीला पुन्हा कर्णधारपद मिळण्याचे संकेत देण्यात आले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर कोहलीला हा इशारा मिळाला होता, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की त्याला अ‍ॅडलेडनंतर कर्णधारपद मिळेल असे संकेत देण्यात आले होते, परंतु नंतर परिस्थिती बदलली. तथापि, मालिकेच्या मध्यात विराटला कर्णधार बनवले गेले असते की नाही हे सांगितले जात नाही, परंतु रोहितला शेवटच्या कसोटीतून वगळावे लागले असल्याने, हे घडले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहने सिडनीमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले होते.

मालिकेतील पराभवानंतर कहाणी बदलली

रिपोर्टमध्ये पुढे म्हटले की, संघ व्यवस्थापनाचा विचार बदलला आणि त्यांनी तरुण कर्णधाराचा शोध सुरु केला होता. तर विराट पुन्हा टीम इंडियाचे कर्णधारपद मिळेल अशी आशा बाळगून बसला होता. बीसीसीआयच्या आदेशानुसार तो फेब्रुवारीमध्ये दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीचा सामनाही खेळला होता, परंतु एप्रिलमध्ये कोहलीला सांगण्यात आले की त्याच्याकडे फक्त एक खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. यानंतर कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ते सरनदीप सिंग यांनीही काही धक्कादायक खुलासे केले. सिंग हे दिल्ली संघाचे प्रशिक्षक देखील आहेत. ते म्हणाले की, विराटच्या निवृत्तीचे कोणतेही चिन्ह नव्हते. मला याबाबत कुठूनही ऐकायला मिळाले नव्हते. काही दिवसांपूर्वी, मी त्याच्याशी बोललो, पण तो असा काही विचार करत असल्याचे मला कोणतेही संकेत मिळाले नव्हते. तो ज्या प्रकारचा आयपीएल खेळत आहे, तो अविश्वसनीय फॉर्ममध्ये आहे.

सरनदीप सिंग यांचा मोठा दावा

सरनदीप पुढे म्हणाले की, मी त्याला विचारले होते की तो कसोटी सामन्यांपूर्वी काउंटी क्रिकेट खेळणार आहे का? त्यावर तो म्हणाला होता की, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला भारत 'अ' संघाचे दोन सामने खेळायचे आहेत. त्याने हे आधीच ठरवले होते, परंतु अचानक आम्हाला कळले की तो आता कसोटी क्रिकेट खेळणार नाही. फिटनेसचा प्रश्न नाही. फॉर्मचा प्रश्न नाही. त्याने ऑस्ट्रेलियात शतक केले पण तो समाधानी नव्हता. रणजी ट्रॉफीदरम्यान तो म्हणत होता की त्याला इंग्लंडमध्ये तीन-चार शतके झळकावयाची आहेत.

दरम्यान, सिंगच्या या वक्तव्यांमुळे कोहलीच्या निवृत्तीवर अधिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोहलीची संघ व्यवस्थापनाबद्दल काही तक्रार होती का? त्याला असे वाटले का की त्याला संघात तो रिस्पेक्ट मिळत नाही जो त्याला मिळायला हवा होता? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. या रिपोर्टवरुन असे सूचित होते की, कोहलीच्या निवृत्तीमागे इतरही काही कारणे असू शकतात, जी अद्यापही समोर आलेली नाहीत. कदाचित त्याला कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर तो नाराज असेल किंवा कदाचित त्याला असे वाटले असेल की संघ व्यवस्थापन त्याला पाठिंबा देत नाही. परंतु कारण काहीही असो, कोहलीची निवृत्ती ही भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी हानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT