Sameer Amunekar
रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सने पराभव केला.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं रवींद्र जडेजा (53*) आणि शिवम दुबे (50) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 176 धावा केल्या.
प्रत्यूतरात स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला 9 विकेट्सने धूळ चारली. मुंबई इंडियन्सकडून हिटमॅन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं दमदार फलंदाजी केली.
रोहितनं नाबाद 76 धावा केल्या, तर सूर्यानं 68 धावांची तुफानी खेळी केली. रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
रोहितने आयपीएलमध्ये 20वा सामनावीर पुरस्कार जिंकला. अशाप्रकारे त्याने विराट कोहलीला मागे टाकले. आयपीएलमध्ये विराटला 19व्यांदा हा पुरस्कार देण्यात आला आहे.