Sameer Panditrao
रोहित शर्माची सध्या जोरात चर्चा आहे. का ते जाणून घेऊ.
रोहित शर्मा नेहमीच आक्रमक फलंदाजी करतो. पण फलंदाजीच्या वेगळ्या गोष्टीमुळे त्याची जास्त चर्चा होतेय.
सोशल मीडियावर चर्चा होत आहे की रोहित शर्मा प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे स्वप्न जगतोय.
बहुतांशी IPL सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून बॅटिंगला येतोय आणि फक्त शेवटच्या काही ओव्हर फिल्डिंग करतोय.
कप्तानीचा भार हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असल्याने ही सुविधा त्याला वापरता येतेय.
गल्ली क्रिकेटमध्ये साधारणत: लोकांना फक्त बॅटिंग हवी असते, फिल्डिंग नको असते.
या गोष्टीमुळे रोहित शर्माबाबत मजेत 'नो फिल्डिंग ओन्ली बॅटिंग' अशी चर्चा होत आहे.