Mumbai Madgaon Vande Bharat Express
Mumbai Madgaon Vande Bharat ExpressDainik Gomantak

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

Mumbai Margao Vande Bharat Express: मुंबई–मडगाव दरम्यान धावणाऱ्या मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस या लोकप्रिय वेगवान गाडीची क्षमता तातडीने वाढवावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
Published on

Mumbai Goa Vande Bharat Update : मुंबई–मडगाव दरम्यान धावणाऱ्या मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस या लोकप्रिय वेगवान गाडीची क्षमता तातडीने वाढवावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सध्या ही गाडी केवळ आठ डब्यांच्या रचनेत धावत असून प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाही क्षमतेत वाढ करण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक गर्दी नोंदवणाऱ्या सेवांपैकी ही एक सेवा मानली जाते.

प्रवासी संघटनांच्या मते, भारतीय रेल्वेने इतर अनेक वंदे भारत गाड्यांमध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवल्यानंतर सोळा किंवा वीस डब्यांपर्यंत वाढ केली आहे. त्याच धर्तीवर मुंबई–मडगाव मार्गालाही वीस डब्यांची कायमस्वरूपी रचना द्यावी, अशी मागणी होत आहे. कोकण पट्ट्यातील प्रवासी, व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित घटक या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई या वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेकडे वर्ग झाल्यामुळे मुंबईतील देखभाल सुविधा आणि पिट मार्गांवरचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव गाडीची क्षमता वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Madgaon Vande Bharat Express
Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे मंडळ तसेच संबंधित विभागांना पत्र पाठवून ही वाढ तातडीने अमलात आणण्याची मागणी केली आहे. उच्च मागणी असलेल्या या मार्गावर कमी क्षमतेची गाडी चालवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणातील प्रवासी दीर्घकालीन आणि रास्त मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Mumbai Madgaon Vande Bharat Express
Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला केवळ कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या भागात प्रीमियम गाडीचे मर्यादित थांबे हा विरोधाभास मानला जात आहे. सावंतवाडी येथेही या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी सुरुवातीपासून सातत्याने होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आश्वासन दिले असले तरी अद्याप प्रत्यक्ष निर्णय झालेला नाही. गाडीची रचना वीस डब्यांची करून सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा, यासाठी प्रवासी संघटना प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com