Milind Soman Holi Celebration In Goa
Milind Soman Dainik Gomantak

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

Milind Soman Holi Celebration In Goa: संपूर्ण देश जिथे रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला असताना फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणने यंदाची होळी अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक पद्धतीने साजरी केली.
Published on

पणजी: संपूर्ण देश जिथे रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला असताना फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणने यंदाची होळी अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक पद्धतीने साजरी केली. मिलिंदने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर केवळ रंगांची उधळण न करता, अथांग समुद्रात तब्बल 15 किलोमीटर पोहोण्याचा पराक्रम गाजवला. या अनोख्या 'वॉटर होळी'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

मिलिंद सोमणने (Milind Soman) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा थरारक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये मिलिंद गोव्याच्या निळ्याशार समुद्रात लाटांशी झुंज देताना दिसत आहे. त्याच्यासोबत पत्नी अंकिता कोंवर आणि टीम आहे. मिलिंदने पोस्टमध्ये नमूद केले की, त्याने काल (3 मार्च) गोव्याच्या समुद्रात 15 किलोमीटरचे अंतर पोहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्याची पत्नी अंकिता कोंवर हिने देखील त्याला उत्तम साथ देत 4.5 किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले.

Milind Soman Holi Celebration In Goa
Milind Soman: 'फिटनेस आयकॉन'ची मुंबई-गोवा सायकलसवारी, मिलिंद सोमणने 5 दिवसांत कापले 558 किलोमीटरचे अंतर

मिलिंदने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "काल गोव्यात (Goa) 15 किमीची स्विम पूर्ण केली! अंकिताने 4.5 किमी अंतर कापले. 'गोवा ओपन वॉटर स्विमिंग क्लब'चे खूप खूप आभार. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!" मिलिंदचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. अनेकांनी "वय हा केवळ आकडा आहे," अशा प्रतिक्रिया देत मिलिंदच्या स्टॅमिनाचे कौतुक केले.

मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 58व्या वर्षीही त्याची ऊर्जा तरुणांना लाजवणारी आहे. गोव्यातील 'ओपन वॉटर स्विमिंग' ही एक कठीण कसरत मानली जाते, कारण समुद्राच्या लाटा आणि पाण्याचा प्रवाह यांच्याविरुद्ध पोहणे सोपे नसते. मिलिंदने यापूर्वीही अनेक मॅरेथॉन आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊन फिटनेसचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Milind Soman Holi Celebration In Goa
59व्या वर्षीही तरुणांना लाजवतोय Milind Soman! पाऊस, वारा, डोंगर पार करत सायकलवर निघालाय गोव्याला Watch Video

या व्हिडिओत मिलिंद आणि अंकिता पोहल्यानंतर समुद्राच्या काठी होळीचा आनंद साजरा करतानाही दिसत आहेत. मिलिंदची ही 'फिटनेस वाली होळी' सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली असून "सण साजरा करताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका," असाच जणू संदेश त्याने या माध्यमातून दिला. रंगांच्या या सणात मिलिंदने आपल्या जिद्दीचा रंग दाखवत चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com