Manish Jadhav
रोहित शर्मा आणि कंपनीचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंतचा हंगाम शानदार राहिला आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. आता टीम इंडियाला तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे.
टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध विजयी घौडदोड सुरु ठेवू इच्छितो. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलच्या एका मोठ्या विक्रमावर लक्ष केंद्रित करेल.
खरंतर, रोहितने भारतासाठी 496 सामन्यांच्या 529 डावांमध्ये 19581 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतके आणि 107 अर्धशतकांचा समावेश आहे. जर रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फक्त 13 धावा केल्या तर तो ख्रिस गेलला मागे सोडेल.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. रोहितच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर (34357), विराट कोहली (27503) आणि राहुल द्रविड (24208) आहेत.
रोहित यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण करु शकतो. अशी कामगिरी करणारा तो जगातील 14 वा खेळाडू बनेल.