PM Modi's Pariksha Pe Charcha Dainik Gomantak
देश

Pariksha Pe Charcha: पीएम मोदी करणार 'परीक्षा पे चर्चा', करोडो विद्यार्थ्यांना स्वतः परीक्षेच्या टिप्स देणार

PM Modi's Pariksha Pe Charcha: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात पीएम मोदींनी 2018 पासून केली होती. आता 'परीक्षा पे चर्चा' देशातील विद्यार्थ्यांमध्येच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

Ashutosh Masgaunde

PM Modi will conduct 'Pariksha Pe Charcha', will give exam tips to crores of students himself:

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी परीक्षांबाबत चर्चा करणार आहेत.

PM मोदी आज म्हणजेच 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील भारत मंडपममध्ये 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात बोलणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात पीएम मोदींनी 2018 पासून केली होती. आता 'परीक्षा पे चर्चा' देशातील विद्यार्थ्यांमध्येच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

दिल्लीतील भारत मंडपम येथे आज सकाळी ११ वाजल्यापासून 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम सुरू होईल. यावर्षी २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएम मोदींसोबतच्या या चर्चेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. यावर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंगही सर्व विद्यापीठांमध्ये केले जाणार आहे.

पीएम मोदींच्या विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा'ची ही सातवी आवृत्ती आहे. 2018 पासून त्यांनी याची सुरुवात केली, त्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 'परीक्षा पे चर्चा'ची लोकप्रियता दरवर्षी वाढत आहे, याचा अंदाज त्यासाठी केलेल्या कोट्यवधी नोंदणीवरून लावता येतो.

पीएम मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' 2024 पूर्वी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे. एक्स अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी लिहिले, '२९ जानेवारी सकाळी ११ वाजता!, परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी एकत्रितपणे रणनीती आखण्यासाठी #ExamWarriors चा सर्वात संस्मरणीय मेळावा मी 'परीक्षा पे चर्चा' ची आतुरतेने वाट पाहत आहे. त्या परीक्षेतील निराशेला संधींच्या खिडक्यांमध्ये बदलूया...'

यावेळी पीएम मोदींनी एक्सवर एक लिंक शेअर केली आहे ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विविध महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

लिंकवर क्लिक केल्यानंतर 'https://www.narendramodi.in/parikshapecharcha' वेबसाइट उघडेल. मुख्यपृष्ठावर, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी बोर्ड परीक्षेच्या टिप्स व्हिडिओ, प्रतिमा आणि विविध टिप्सच्या मजकूराद्वारे सामायिक केल्या आहेत. तुम्हालाही टिप्स मिळवायच्या असतील तर येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

कुठे पाहू शकता 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम?

'परीक्षा पे चर्चा'चे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया, पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनेल यांच्यासह प्रमुख खाजगी चॅनेलवरही केले जाईल. यासोबतच नुकतेच UGC ने उच्च शिक्षण संस्थांना देखील संबंधित संस्थांमध्ये कार्यक्रम प्रदर्शित करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा'च्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, "सध्याच्या 7 व्या आवृत्तीत MyGov पोर्टलवर 2.26 कोटी नोंदणी झाली आहेत, जी देशभरातील विद्यार्थ्यांमधील व्यापक उत्साह दर्शवते."

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांव्यतिरिक्त 14.93 लाख शिक्षक आणि 5.69 लाख पालकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी 11 डिसेंबर 2023 ते 12 जानेवारी 2024 पर्यंत चालली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT