Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Goa vs Himachal: एलिट ‘क’ गटातील चार दिवसीय सामन्याला मंगळवारपासून कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर सुरवात झाली.
Under 23 Cricket
Under 23 CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: हिमाचल प्रदेशचा संघ संकटात असताना गोव्याने प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत अडकविण्याची संधी गमावली, त्यामुळे २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर पाहुण्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात त्रिशतकी मजल गाठली.

एलिट ‘क’ गटातील चार दिवसीय सामन्याला मंगळवारपासून कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर सुरवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी ६ बाद ३१५ धावा केल्या होत्या. त्यांच्या डावाला स्थिरता देणारा अर्जुन वाधवा १२५ धावांवर खेळत होता. त्याने २१० चेंडूंचा सामना करताना १० चौकार व तीन षटकार मारले. संघ ४ बाद ७५ असा संकटात असताना अर्जुन हिमाचल प्रदेशसाठी संकटमोचक ठरला.

Under 23 Cricket
Goa Politics: 'खरी आरजी कोणती?' यापेक्षा नेते एकत्र राहणार का? अंतर्गत संघर्षाने पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

अर्जुनने अगोदर अर्णव जामवाल (२७) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली, नंतर सहाव्या विकेटसाठी अक्षय वशिष्ट (७४) याच्यासह १४५ धावांची भागीदारी करून संघाला सुस्थिती गाठून दिली. अक्षयने १२४ चेंडूंचा सामना करताना नऊ चौकार मारले. गोव्यातर्फे गोलंदाजीत डावखुरा फिरकी गोलंदाज अनुज यादव (३-९४) उल्लेखनीय ठरला.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश, पहिला डाव : ८६ षटकांत ६ बाद ३१५ (अर्पित सिंग ३०, अर्जुन वाधवा नाबाद १२५, अर्णव जामवाल २७, अक्षय वशिष्ट ७४, नौनिहाल अट्टलास नाबाद २३, विनायक कुंटे १३-१-६५-१, पियुष देविदास ६-०-३०-०, अनुज यादव ३४-६-९४-३, दीप कसवणकर २७-६-८९-१, आफ्रिद राजाक्कनावर ३-०-११-०, मोहित यादव ३-०-१७-१) वि. गोवा.

Under 23 Cricket
Goa LPG Project: मुरगाव बंदरात 5 हजार कोटींचे एलपीजी टर्मिनल; 2,450 रोजगार, 80 टक्के पदे गोमंतकीयांसाठी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.