Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

Nhai Free Flow Tolling System Mlff 2026: देशभरातील टोल प्लाझावरील लांबलचक रांगा आणि ट्रॅफिकच्या समस्येपासून वाहनचालकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.
Nhai Free Flow Tolling System Mlff 2026
Toll Tax New RulesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nhai Free Flow Tolling System Mlff 2026: देशभरातील टोल प्लाझावरील लांबलचक रांगा आणि ट्रॅफिकच्या समस्येपासून वाहनचालकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने टोलिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठे स्ट्रक्चरल बदल करण्याचे जाहीर केले असून, भविष्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर 'फ्री-फ्लो टोलिंग' प्रणाली सक्तीची करण्यात आली. याचा अर्थ आता टोल टॅक्स भरण्यासाठी वाहनचालकांना टोल प्लाझावर अजिबात थांबावे लागणार नाही. गाड्या न थांबता किंवा वेग न कमी करता भरधाव वेगाने टोल ओलांडू शकतील आणि बॅरियर क्रॉस करतानाच खात्यातून ऑटोमॅटिक टोल टॅक्स कापला जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट घरी डिजिटल चलन पोहचेल.

एनएचएआयच्या नवीन योजनेनुसार, भविष्यातील सर्व टोल प्लाझावर जास्तीत जास्त 8 लेन्सची मर्यादा असेल, तर सध्या काही मार्गांवर 32 लेन्सपर्यंतचे मोठे लेआउट आहेत. आता मोठे फिजिकल टोल प्लाझा तयार करण्याऐवजी 'एमएलएफएफ' सिस्टीम बसवली जाईल. ही प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन रीडर आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्यांनी सुसज्ज ओव्हरहेड गॅन्ट्रीवर काम करेल. यामुळे टोल बूथची गरज पूर्णपणे संपुष्टात येईल.

Nhai Free Flow Tolling System Mlff 2026
Toll Tax Rate Hiked: प्रवास झाला महाग, लोकसभा निवडणुक संपताच टोल दरात एवढ्या टक्क्यांनी वाढ

हा नवीन नियम आगामी सर्व हायवे प्रकल्पांवर लागू होईल, तर ज्या प्रकल्पांचे काम अद्याप सुरु झाले नाही, त्यांना नवीन डिझाईननुसार बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे भूसंपादनाचा खर्च आणि देखभाल खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार असून टोल वसुलीचा ऑपरेटींग खर्च 12 ते 15 टक्क्यांवरुन थेट 3 ते 4 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे.

Nhai Free Flow Tolling System Mlff 2026
Toll Tax: हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने टोल टॅक्स केला कमी!

नवीन ऑटोमेटेड सिस्टीम अंतर्गत वाहनांच्या विंडशील्डवर असलेला फास्टॅग आणि नंबर प्लेट ओव्हरहेड गॅन्ट्रीवरील स्मार्ट कॅमेरे व सेन्सर्सद्वारे स्कॅन केली जाईल. जर फास्टॅग खात्यात बॅलन्स नसेल तर वाहनमालकाला ई-नोटिस जारी केली जाईल, जी 72 तासांच्या आत भरावी लागेल. अन्यथा दुप्पट दंड भरावा लागेल तसेच फास्टॅग किंवा फिटनेस सर्टिफिकेट ब्लॅकलिस्ट होऊ शकते. वाहनचालक 'राजमार्गयात्रा' ॲपवर जाऊन सहज आपला टोल फी भरु शकतील. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून हायवेवरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.