‘यूट्यूब व्हिडिओ लाईक’ करण्याचा जॉब, मुंबईत महिलेला फेक आयटी कंपनीकडून लाखोंचा गंडा

पोलिसांनी फेक कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक केली आहे.
Youtube
Youtube
Published on
Updated on

मुंबईतील एका 29 वर्षीय महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष देत लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणेज फेक आयटी कंपनी स्थापन करून सहा जणांनी महिलेला गंडा घातला.

पोलिसांनी फेक कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक केली आहे.

संशयित आरोपींनी व्हर्च्युअल वॉलेट तयार केले ज्यामध्ये महिलेला नफा होत असल्याचे दाखविण्यात आले. आरोपींनी, मुंबई पोलिसांनी तिचे खाते ब्लॉक केले असल्याचे पत्र महिलेला पाठविण्यात आले. खाते क्लिअर करण्यासाठी त्यांनी तिच्याकडून पैसे घेतले. दोन आठवड्यात तिची 11.4 लाख रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी बिंदुसार शेलार (४०), महेश राऊत (२४), योगेश खौले (२८ (सर्व पुणे) आणि अमरावती येथील अक्षय खडसे (२७) आणि अमित तवार (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

महिलेने दोन जॉब पोर्टलवर जॉबसाठी आपला बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर एका व्‍यक्‍तीचा तिला व्‍हॉट्सअॅप मेसेज आला की तिला YouTube व्हिडिओ लाईक करण्‍याच्‍या कामात रस आहे का? दरम्यान महिलेने कामात रस दाखवला, महिलेने कामाला सुरूवात करून आपल्या कामाचे स्‍क्रीनशॉट आरोपीला पाठवले. त्यानंतर तिच्या खात्यात 750 रुपये जमा केले.

Youtube
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या गोव्यात; समुद्रात INS विक्रांतवर होणार नौदलाची कॉन्फरन्स

त्यानंतर आरोपीने महिलेला टेलिग्राम ग्रुपवर सामील होण्यास सांगितले. “त्यांनी तक्रारदाराला सांगितले की त्यांनी तिचे व्हर्च्युअल वॉलेट तयार केले आहे जिथे ती तिचा नफा पाहू शकते. महिलेला व्हर्च्युअल वॉलेटमध्ये तीन लाख रुपये आढळून आले. नंतर, तिला त्यांच्या ‘बिझनेस पॅकेज’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले आणि वेगवेगळी फी भरण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, तिला मुंबई पोलिसांचे बनावट पत्र पाठवले की तिचे वॉलेट गोठले आहे आणि ते क्लिअर करण्यासाठी तिला पैसे पाठवावे लागतील. असे सांगण्यात आले. दोन आठवड्यात आरोपींनी तिच्याकडून 11. 43 लाख रुपये घेतले. त्यानंतर तिचे खाते बंद करण्यात आले. तिची फसवणूक झाल्याचे तिला कळले आणि तिने एफआयआर दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com