West Bengal Crime Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: सैतानांची बळी ठरली चौथीतली कोवळी विद्यार्थीनी... सामूहिक बलात्कार करणारे नराधम गजाआड!

Crime News: आरोपी तरुणाला चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

Manish Jadhav

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील बालूरघाटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजारच्या तरुणाने आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रार मिळताच बालूरघाट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या विक्रम दासला बालूरघाट जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

यादरम्यान आरोपी तरुणाच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. मात्र, न्यायाधीशांनी पोलीस कोठडीचे आदेश दिले नाहीत. दुसरीकडे, पीडित अल्पवयीन मुलीला शारीरिक तपासणीनंतर बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले.

दरम्यान, लवकरच पीडित मुलीचे गोपनीय जबाब घेण्यात येणार असल्याचे कळते आहे. याप्रकरणी बालूरघाट पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास बालूरघाट पोलीस (Police) करत आहेत.

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेला आई नाही. ती खूप आधी घर सोडून गेली होती. वडीलही कामानिमित्त इतर राज्यात राहतात. अल्पवयीन मुलगी तिच्या वृद्ध आजीसोबत एकटीच राहते.

सुमारे आठवडाभरापूर्वी अल्पवयीन मुलीला शेजारील तरुण आणि त्याच्या साथीदारांनी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या तरुणाने त्या घटनेचा व्हिडिओही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. या घटनेबाबत कोणालाही न सांगण्याची धमकीही अल्पवयीन मुलीला देण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी दुपारी पुन्हा अल्पवयीन मुलीला उचलण्याचा प्रयत्न केला असता तिने तेथून पळ काढला. नंतर घरी येऊन तिने आजीला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री तिच्या कुटुंबीयांनी बालूरघाट पोलिस ठाण्यात संपर्क साधला.

अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसोबत एकटीच राहते

याप्रकरणी पीडितेच्या आजीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी रात्रीच आरोपीला अटक केली.

अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकाने सांगितले की, “तिला आई-वडीलही नाहीत. आजी आपल्या नातीसोबत एकटीच राहते. काल जेव्हा नात रडत रडत आली आणि तिने आजीला सगळा प्रकार सांगितला. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे.''

दुसरीकडे, कूचबिहार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल डे म्हणाले की, “काल रात्री बालूरघाट पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली. रात्री आरोपीला (Accused) अटक करण्यात आली आहे. पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करत आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

SCROLL FOR NEXT