West Bengal Crime: प्रेमात विश्वासघात! लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने ठेवले अल्पवयीन मुलीशी संबंध, न्यायालयाने...

Court: आसनसोल जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एडीजे (द्वितीय) आणि POCSO खटल्यातील विशेष न्यायाधीश शरण्य सेन प्रसाद यांनी दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्यात हा निकाल दिला.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Crime: पश्चिम बंगालच्या आसनसोल न्यायालयाने एका तरुणाला लग्नाचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

आसनसोल जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एडीजे (द्वितीय) आणि POCSO खटल्यातील विशेष न्यायाधीश शरण्य सेन प्रसाद यांनी दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्यात हा निकाल दिला. न्यायालयाने शुक्रवारी सुरेंद्र हंसदा याला दोषी ठरवले.

दरम्यान, न्यायाधीशांनी आरोपी तरुणाला आयपीसीच्या कलम 376 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दोषी ठरवले आणि आरोपी तरुणाला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपी (Accused) तरुणाला 10 हजार रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले.

Court
West Bengal Crime: पत्नी बेपत्ता झाल्याचा केला बनाव; सीआयडीने उलगडला सेप्टिक टँकमधील डाव

दुसरीकडे, आरोपी सुरेंद्र हंसदा हा आसनसोल दक्षिण पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. डमरा परिसरात त्याचे घर आहे.

दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये याच भागातील एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी आसनसोल दक्षिण पोलिस ठाण्यात हा आरोप करत एफआयआर (FIR) दाखल केला होता. लग्नाचे आश्वासन देऊन आरोपीने अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले, असे आरोपात म्हटले होते.

फसवणूक केल्याबद्दल 10 वर्षांची शिक्षा

तसेच, आरोपी पाच महिन्यांपासून अल्पवयीन मुलाच्या संपर्कात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. यादरम्यान अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी तरुणावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

Court
West Bengal Crime: अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्घुण हत्या, रात्रभर लोक शोधत राहिले; सकाळी...

दुसरीकडे, तरुणाने लग्नास नकार दिला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी आसनसोल पोलीस ठाणे गाठून आरोपी सुरेंद्र हंसदाविरुद्ध एफआयआर दाखल केला.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई सुरु केली.

पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईच्या आधारे आरोपी तरुण सुरेंद्र हंसदा याला अटक करण्यात आली. अटकेनंतर आसनसोल जिल्हा न्यायालयात खटला सुरु होता.

पीडितेला मुलाच्या संगोपनासाठी 5 लाख मिळणार आहेत.

या प्रकरणी आसनसोल न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध ठेवल्यानंतर तिने एका मुलालाही जन्म दिला. पीडितेच्या कल्याण निधीतून पाच लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणी एकूण नऊ जणांनी न्यायालयात साक्ष दिली. यामध्ये डॉक्टर आणि इतरांचा समावेश आहे. साक्षीच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच पीडितेला पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिले.

Court
West Bengal Train Accident: वर्धमानमध्ये लोकल ट्रेन रुळावरून घसरल्याने मोठा अपघात

त्याचवेळी, वकिलाने मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली, जेणेकरुन मुलाच्या आई आणि वडिलांची ओळख होऊ शकेल, परंतु सध्या या संदर्भात न्यायालयाची परवानगी मिळालेली नाही. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरही ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com