Gurpreet Kaur Dainik Gomantak
देश

कोण आहेत गुरप्रीत कौर? सीएम भगवंत मान पुन्हा अडकणार विवाहबंधनात

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी, (7 जुलै रोजी) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Gurpreet Kaur Biography: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी, (7 जुलै रोजी) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. मुख्यमंत्री मान सहा वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले होते. आता त्यांचे दुसरे लग्न चंदीगडमध्ये डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत कुटुंबीय आणि मित्र परिवारांच्या उपस्थितीत होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे ही या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याआधी आम्ही तुम्हाला पंजाबच्या सीएमची वधू डॉ. गुरप्रीत कौरबद्दल सांगणार आहोत.

दरम्यान, डॉ. गुरप्रीत कौर या 32 वर्षांच्या आहेत. गुरप्रीत यांचे कुटुंब कुरुक्षेत्रातील पेहोवामधील टिळक नगर येथील आहे. त्यांचे वडील इंद्रजीत सिंग हे शेतकरी (Farmers) असून मदनपूर गावचे माजी सरपंच आहेत. त्यांची आई राज कौर गृहिणी आहेत. गुरप्रीत कौरला आणखी दोन बहिणी आहेत.

कोण आहे गुरप्रीत कौर?

गुरप्रीत कुटुंबातील सर्वात लहान आहेत. त्यांची एक बहीण ऑस्ट्रेलियात तर दुसरी अमेरिकेत (America) वास्तव्यास आहे. गुरप्रीत कौर यांनी अंबाला येथील मौलाना मेडिकल कॉलेजमधून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. भगवंत मान आणि गुरप्रीत कौर हे दोघेही कौटुंबिक मित्र असल्याचे सांगितले जाते. ते एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. डॉ. गुरप्रीत कौर शीख कुटुंबातील असून सीएम मान यांच्या आई आणि बहिणीने त्यांची निवड केली आहे. ज्यांना सीएम मान यांनी पुन्हा लग्न करावे अशी इच्छा होती.

भगवंत मान यांची पहिली पत्नी कोण आहे?

भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचे झाल्यास त्या दोन मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांची दोन्ही मुले भारतात आली होती. भगवंत सिंग मान यांच्या नेतृत्वाखाली, AAP ने पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. याआधी भगवंत मान यांनी पंजाबच्या संगरुर मतदारसंघातून लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT