Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

Goa Water Resources Department: काणकोण, केपे आणि धारबांदोडा तालुक्यांतील एकूण ११६ बंधाऱ्यांमध्ये १५ नोव्हेंबरपूर्वी पाणी अडविण्यात आले आहे.
Goa Water Resources Department
Check Dam ConstructionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: काणकोण, केपे आणि धारबांदोडा तालुक्यांतील एकूण ११६ बंधाऱ्यांमध्ये १५ नोव्हेंबरपूर्वी पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता धनंजय नागवेकर यांनी दिली.

काणकोण विभागीय कार्यक्षेत्रात ४८, तर केपे व धारबांदोडा विभागांत ७८ बंधारे अडवले आहेत. काणकोणमध्ये खारे पाणी रोखण्यासाठी हे बंधारे उभारण्यात येतात. त्यात गालजीबाग नदीवरील भटाबांध आणि माशे येथील दोन बंधाऱ्यांचा समावेश आहे. गावडोंगरी व खोतीगाव परिसरात बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग भाजीपाला लागवडीसाठी केला जातो.

Goa Water Resources Department
FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

दरम्यान, बंधाऱ्यांतील पाणी सोडल्यानंतर फायबर निडल्स चापोली येथील गोदामात सुरक्षित ठेवणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र, खोतीगावातील तामणामळ व पणसुलेमळ येथे लाखो रुपये किमतीच्या फायबर निडल्स बंधाऱ्यांजवळ बेवारस स्थितीत पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिस गस्त ठेवा

काही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून, युवक जलक्रीडा व पोहण्यासाठी त्यांचा वापर करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधाऱ्यांजवळ पोलिस गस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

Goa Water Resources Department
Goa Politics: महिला मोर्चा केवळ संघटना नाही, तो एक 'ब्रँड' आहे; मग संघर्षाची धार का बोथट झाली?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.