मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, या लोकांना मिळाले आमंत्रण

सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले.
Dr Gurpreet Kaur and Punjab CM Bhagwant Mann
Dr Gurpreet Kaur and Punjab CM Bhagwant MannTwitter

Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी लग्न करणार आहेत आणि या बातमीमुळे पंजाबच्या राजकीय विश्वात सध्या आनंदाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले. हा विवाह सोहळा मुख्यमंत्री मान यांच्या निवासस्थानी छोट्या स्वरूपात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि जवळचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.

भगवंत मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यांची पहिली पत्नी इंद्रजीत कौर आणि मुले अमेरिकेत राहतात. 2016 मध्ये दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर इंद्रजित मुलांसह अमेरिकेला गेल्या. यापूर्वी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची दोन्ही मुले आली होती.

Dr Gurpreet Kaur and Punjab CM Bhagwant Mann
Punjab: भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, पाच नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ

आई आणि बहिणीने मुलीची निवड केली

माहितीनुसार, भगवंत मान यांची आई हरपाल यांची इच्छा होती की मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांचा संसार पुन्हा सुरू करावा. आई आणि बहीण मनप्रीत कौर यांनी स्वतः मुलीची सीएम भगवंत मान यांच्यासाठी निवड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान हे राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. 2014 आणि 2019 मध्ये ते सलग दोन वेळा खासदार झाले.

Dr Gurpreet Kaur and Punjab CM Bhagwant Mann
केजरीवालांची मोठी घोषणा! दिल्लीत होणार देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल

या वर्षी मार्चमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करून निवडणूक लढवली होती. राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्याने भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाले. 48 वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com