Punjab: भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, पाच नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ

पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak

Expansion of Bhagwant Mann's Cabinet: पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सोमवारी पाच नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पंजाबमधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सुनमचे आमदार अमन अरोरा, अमृतसर दक्षिण इंदरबीर सिंग निज्जर, फौजा सिंग सरारी, चेतिन सिंग जौरामजरा आणि अनमोल गगन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान, राजभवनाच्या सभागृहात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. घटनेनुसार पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्रिपदासाठी एकूण 18 मंत्री असू शकतात. मंत्रिमंडळात पाच नवीन सदस्यांचा समावेश झाल्यानंतर येथील एकूण मंत्र्यांची संख्या 15 झाली आहे. म्हणजेच तीन मंत्र्यांसाठी अजूनही जागा आहे.

Bhagwant Mann
Punjab: लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या नेत्याने 'दहशतवाद्याला' दिले श्रेय

दुसरीकडे, सुनमचे आमदार अरोरा हे दोनदा विधानसभेत गेले आहेत. त्यांच्याशिवाय बाकीचे पहिल्यांदा आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. या पाच मंत्र्यांपैकी चार माळवा विभागातील आणि एक माझा विभागातील आहे. गेल्या आठवड्यात भगवंत मान (Bhagwant Mann) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यादरम्यान संभाव्य मंत्र्यांच्या नावांवरही चर्चा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com