Vijay Merchant Trophy: विश्राम परबची झुंज व्यर्थ; कर्नाटकाकडून गोव्याचा डाव व 168 धावांनी दणदणीत पराभव

Goa vs Karnataka Vijay Merchant Trophy Match: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकने गोव्यावर सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी डाव व १६८ धावांनी मोठा विजय नोंदविला.
Goa vs Karnataka Vijay Merchant Trophy Match
Vijay Merchant TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकने गोव्यावर सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी डाव व १६८ धावांनी मोठा विजय नोंदविला. सामना लखनौ येथे झाला. कर्नाटकने गोव्यावर पहिल्या डावात ३२८ धावांची आघाडी घेतल्यानंतर गोव्याचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आला.

गोव्याचा कर्णधार विश्राम परब याने अर्धशतक नोंदविताना १२८ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ५० धावा केल्या. याशिवाय दहाव्या क्रमांकावरील दिगंत मनोहर याने १९ चेंडूंत तीन षटकार व तेवढ्याच चौकारांसह ३२ धावा केल्यामुळे गोव्याने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. गोव्याच्या खाती दोन लढतीनंतर एक गुण आहे. हा त्यांचा पहिला पराभव ठरला. एलिट ‘ब’ गटातील पुढील सामना २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्राविरुद्ध लखनौ येथे खेळला जाईल.

Goa vs Karnataka Vijay Merchant Trophy Match
FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : ९७ व दुसरा डाव : ५२.३ षटकांत सर्वबाद १६० (युवराज दाभोळकर ७, विश्राम परब ५०, तनिष्क नाईक १६, वंश कुडतरकर १५, संच नाईक १०, शौर्य चोडणकर ०, ईशांत तिवरेकर १३, मृणाल नाईक ०, मुबारक ताडपत्री १०, दिगंत मनोहर ३२, स्पर्श गावस नाबाद ०, एस. विधात ३-३४, एच. जी. प्रीतम ५-६८) पराभूत वि. कर्नाटक, पहिला डाव : ९१ षटकांत ३ बाद ४२५ घोषित (आर. रोहित रेड्डी १७७, समर्थ सुरेश ११४, आर. शिवराज नाबाद ६८, दिगंत मनोहर १०-०-३९-०, तनिष्क नाईक ११-१-३७-०, मुबारक ताडपत्री २०-०-९०-०, शौर्य चोडणकर १९-१-८९-०, मृणाल नाईक १९-१-८१-२, स्पर्श गावस १२-०-८१-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.