FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

FC Goa vs NorthEast United Match Preview: एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर लगेच आंजेल बियादेरो यांना खडतर आव्हानासाठी संघाला तयार करावे लागले आहे.
FC Goa vs NorthEast United Match Preview
FC GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर लगेच आंजेल बियादेरो यांना खडतर आव्हानासाठी संघाला तयार करावे लागले आहे; पण त्याबद्दल त्यांची तक्रार नाही. गुवाहाटी येथे शनिवारी (ता.२१) होणाऱ्या नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीबाबत ५७ वर्षीय प्रशिक्षक आशावादी आहेत.

गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी बियादेरो यांनी सांगितले, की ‘संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मी सराव सत्रात खेळाडूंशी संवाद साधला, त्यावेळी मला प्रचंड उत्साह दिसून आला. खेळाडू शिकण्यासाठी आणि चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्नशील दिसले. माझ्या शैलीत खेळण्यास संघाला थोडासा वेळ लागेल हे खरे असले, तरी संघ प्रेरित आहे. मला तयारीसाठी वेळ कमी मिळाला असला, तरी मैदानावरील आव्हासाठी सज्ज आहोत. नॉर्थईस्ट युनायटेड संघ खडतर असला, तरी आम्ही आश्वासक आहोत. एकंदरीत मी आशावादी आहे.’

FC Goa vs NorthEast United Match Preview
Goa Politics: महिला मोर्चा केवळ संघटना नाही, तो एक 'ब्रँड' आहे; मग संघर्षाची धार का बोथट झाली?

एफसी गोवाने गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चार सामन्यांतून पाच गुणांची कमाई केली आहे. आता पुढील मोहीम बियादेरो यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. यापूर्वी त्यांनी अल्पावधीसाठी (दोन महिने) हुआन पेद्रो बेनाली यांचे साहाय्यक या नात्याने नॉर्थईस्ट युनायटेडसाठी काम केलेले आहे. साहजिकच बियादेरो यांना बेनाली यांची शैली चांगलीच अवगत आहे. नॉर्थईस्ट युनायटेड संघ सध्या स्पर्धेत अपराजीत असून पाच सामन्यांतून ११ गुण आहेत. एफसी गोवाविरुद्ध पूर्ण तीन गुण मिळवून कामगिरी सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.

मैदानात उतरण्यापूर्वी...

एफसी गोवा : ४ सामने, १ विजय, २ बरोबरी, १ पराभव, ५ गुण

नॉर्थईस्ट युनायटेड : ५ सामने, ३ विजय, २ बरोबरी, ११ गुण

एकमेकांविरुद्ध मागील लढतीत : २४ एप्रिल २०२६ रोजी गुवाहाटी येथे एफसी गोवा विजयी २-०

FC Goa vs NorthEast United Match Preview
North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.