Gurpatwant Singh Pannun Murder Plot: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, अमेरिकन कोर्टाचा निखिल गुप्ताला झटका; सुनावली 20 वर्षांची शिक्षा

Nikhil Gupta 235 Months Prison Sentence US Court: अमेरिकेच्या एका न्यायालयाने भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 235 महिने म्हणजेच सुमारे 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
gurpatwant singh pannun murder plot
gurpatwant singh pannun murder plotDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nikhil Gupta 235 Months Prison Sentence US Court: अमेरिकन भूमीवर एका शीख फुटीरतावाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवत अमेरिकेच्या एका न्यायालयाने भारतीय नागरिक निखिल गुप्ताला 235 महिने म्हणजेच सुमारे 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 55 वर्षीय निखिल गुप्ताने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपला गुन्हा कबूल केला होता. त्यांच्यावर हत्येचा कट रचणे आणि मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नाशी हे संपूर्ण प्रकरण निगडित आहे. सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्कचे न्यायाधीश व्हिक्टर मारेरो यांनी सुमारे 80 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर ही शिक्षा सुनावली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर देखरेखीखालील सुटकेचा कोणताही आदेश न देता, तुरुंगवास संपताच त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

gurpatwant singh pannun murder plot
America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

सुनावणीदरम्यान तुरुंगातील तपकिरी गणवेश परिधान केलेल्या निखिल गुप्ता यांना मार्शलनी न्यायालयात हजर केले. त्यांनी इंग्रजीत दिलेल्या सहा मिनिटांच्या संक्षिप्त निवेदनात महात्मा गांधी, मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि मार्टिन लूथर किंग यांच्या शिकवणुकीचा उल्लेख केला. न्यायालयात उपस्थित असलेल्या पन्नू आणि शीख समुदायाकडे पाहत त्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली.

gurpatwant singh pannun murder plot
America Strikes Qeshm Island: केशम बेटावरील स्फोटांनी हादरले इराण! मतदानाच्या दिवशीच अमेरिकेकडून लष्करी कारवाई; 'आत्मरक्षणासाठी' हल्ला केल्याचा दावा

आपल्या पत्नी, आई आणि मुलांना या प्रकरणामुळे मोठा त्रास सहन करावा लागल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला आणि ते कमालीचे भावुक झाले. न्यायालय जी शिक्षा देईल ती स्वीकारुन आपण एक चांगला माणूस बनून बाहेर येऊ, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

gurpatwant singh pannun murder plot
America Shooting: अपार्टमेंटमध्ये धुराचे लोट अन् गोळ्यांचा वर्षाव! सिरिअल शूटरच्या गोळीबारानं हादरली अमेरिका; 2 ठार, पोलिसांसह 7 जण जखमी VIDEO

दुसरीकडे, गुरपतवंत सिंग पन्नू यानेही न्यायालयात (Court) सुमारे 20 मिनिटे आपली बाजू मांडली. जीवितास धोका असल्याचे समजल्यापासून गेल्या 1200 हून अधिक दिवसांपासून आपण नियमित वकिली करु शकलो नसल्याचा दावा त्याने केला. पन्नू याचे निवेदन लांबत गेल्याने अखेर न्यायाधीशांनी त्याला आपले म्हणणे थोडक्यात आटोपण्याची सूचना केली, जेणेकरुन न्यायालयाचे पुढील कामकाज सुरळीत पार पडू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.