Marigold Farming: काणकोणात झेंडूचा बहर; 1,060 क्विंटल उत्पादन, स्थानिक फुलांना ग्राहकांची पसंती

Goa Agriculture: काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा ३.५३३ हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड करून १,०६० क्विंटल फुलांचे उत्पादन घेतले आहे.
Goa Agriculture
Marigold FarmingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा ३.५३३ हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड करून १,०६० क्विंटल फुलांचे उत्पादन घेतले आहे. बडसरे-गावडोंगरी येथील लक्ष्मण सोनू गावकर, सातोर्ली-गावडोंगरी येथील सोनू गावकर आणि भूपर-गावडोंगरी येथील कांता भागडो वेळीप यांनी सर्वाधिक क्षेत्रात झेंडूची लागवड केली आहे.

पूर्वी दसरा, दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि तुळशी विवाहासाठी परराज्यांतून येणाऱ्या झेंडूच्या फुलांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, यंदा स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या फुलांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. कृषी खात्याने शेतकऱ्यांना अनुदानावर झेंडूची रोपे उपलब्ध करून दिली, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी सर्वानंद सवर्णकर यांनी दिली.

Goa Agriculture
FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

काटे कणगानंतर झेंडूची शेतीही शेतकऱ्यांसाठी नगदी पीक ठरत आहे. अवघ्या दीड ते दोन महिन्यांत उत्पादन मिळत असल्याने युवा शेतकरीही या लागवडीकडे वळले आहेत. काही शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणूनही झेंडूची लागवड केली आहे. फुलांना प्रतिकिलो १०० रुपये दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, वानरांपासून पिकाचे संरक्षण करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे सोनू गावकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.