Engineer youth killed a girl who denies to marry him in nellore Dainik Gomantak 
देश

लग्नास नकार, अभियंत्याने गोळ्या झाडून केली तरुणीची हत्या

दैनिक गोमन्तक

विजयवाडा : लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणीची हत्या झाल्याची घटना आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये घडली आहे. सोमवारी नेल्लोर जिल्ह्यातील तातीपर्थी गावात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने एका मुलीवर लग्नाला नकार दिल्याच्या रागातून गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. दोघांचाही रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे.

नेल्लोरचे एसपी विजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय मलापती सुरेश रेड्डी आणि 22 वर्षीय काव्या रेड्डी हे मूळचे तातीपर्थीचे रहिवासी होते. दोघेही बंगळुरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. कोरोना लॉकडाऊनपासून दोघेही गेल्या दोन वर्षांपासून घरुनच काम करत होते. सहा महिन्यांपूर्वी सुरेश एका कार्यक्रमात काव्या या तरुणीला भेटला होता. त्यांच्या ओळखीचं रुपांतर काही दिवसात चांगल्या मैत्रीत झालं होतं. सुरेशला काव्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती.

काही दिवसांनी सुरेशने काव्याचा लग्नासाठी हात मागितला. मात्र, काव्याने त्याला आधी तिच्या आई-वडिलांशी बोलण्यास सांगितलं. त्यानंतर सुरेशने काव्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मुलीशी लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्त केली. मात्र काव्याच्या पालकांनी दोघांच्या वयात तब्बल 13 वर्षांचे अंतर असल्याने लग्नाला परवानगी नाकारली. यानंतर सुरेश एप्रिलमध्ये बंगळुरूला गेला आणि काव्याला फोन करत राहिला. मात्र काव्याने आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध ती जाणार नसल्याचे तिने स्पष्ट करत लग्नाला नकार दिला.

भडकलेल्या सुरेशने सोमवारी दुपारी काव्याचं घर गाठलं आणि तिच्याशी लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून भांडण सुरु केलं. याच कडाक्याच्या वादातून सुरेशने तरुणीवर गोळ्या झाडल्या. यावरच न थांबता त्याने स्वत:वरही गोळ्या झाडल्या. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान ज्यावेळी सुरेश काव्याच्या घरी आला होता त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण जेव्हा त्याने काव्यावर पहिल्यांदा गोळी झाडली, त्यावेळी त्याचा नेम चुकला होता. घाबरलेल्या काव्याने घरात पळण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दुसरी गोळी झाडत आरोपी सुरेशने काव्याची हत्या केली आहे. पोलिसांनी सुरेशच्या कुटुंबीयांची आणि मित्रांचीही चौकशी केली, ज्यात मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तो निराश झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक अमेरिकन बनावटीची असल्याचंही तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सुरेशकडे ही बंदूक आली कुठून याचा तपासही पोलिसांनी सुरु केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT