Earthquake |  Dainik Gomantak
देश

Earthquake in Delhi-NCR: दिल्ली आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंपाने हादरली, काश्मीर खोऱ्यातही...

Earthquake in India: दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.

दैनिक गोमन्तक

Earthquake in India: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 200 किमी खाली आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अफगाणिस्तानातील (Afghanistan) फैजाबादमध्ये भूकंपाचा केंद्र जमिनीपासून 200 किमी खाली होता. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

दुसरीकडे, नवीन वर्षाच्या रात्रीही दिल्ली-एनसीआरमध्ये 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (NCS) ही भारत सरकारची नोडल एजन्सी आहे, जी देशभरातील भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवते. रविवारी नववर्षाच्या रात्री झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू हरियाणातील झज्जरमध्ये होते. ते जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होते. यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआरची जमीन भूकंपाच्या धक्क्याने हादरली होती. एनसीएसनुसार या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी होती. त्याचे केंद्र नेपाळमध्ये (Nepal) होते, आणि विशेष म्हणजे ते जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होते.

याशिवाय, 27-28 डिसेंबरच्या रात्री नेपाळपासून उत्तरकाशीपर्यंत अनेक वेळा लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का नेपाळच्या बागलुंगमध्ये जाणवला. यानंतर दुसरा धक्का खुंगा येथे जाणवला. त्याची तीव्रता 5.3 होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT