Delhi : दिल्लीत भरधाव कारचा थरार; फूटपाथवर उभ्या तीन शाळकरी मुलांना चिरडले; व्हिडीओ व्हायरल

दोघे किरकोळ तर एक गंभीर जखमी
 speeding car
speeding carDainik Gomantak
Published on
Updated on

देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी भरधाव कारने तीन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी कडाक्याची थंडीत मुले शिकवणीसाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

(Three children suffered injuries after they were hit by a speeding car near a school in Delhi )

 speeding car
MP Crime : माय लेकाचा नकली धंदा: पत्र्याच्या शेडात छापले 10 कोटी

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर दिल्लीतील गुलाबीबाग परिसरात आज ( रविवारी ) लीलावती शाळा गुलाबीबाग येथे भरधाव कारने धडक दिल्याने तीन मुले जखमी झाली. या प्रकरणात दिल्ली येथील “गजेंद्र (30 वर्षीय ) हा वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

गजेंद्र हा शाळेजवळून कारसह प्रवास करत असताना त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कारने फूटपाथवर उभ्या मुलांना जोराची धडक दिली. यात तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातातील कार चालक हा दिल्ली येथील प्रताप नगरचा रहिवासी असलेल्याची माहिती समोर आली आहे.

 speeding car
INS Mormugao: आत्मनिर्भर भारताचं आणखी एक पाऊल! नौदलात INS मोरमुगाओ दाखल

उत्तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली असून सुदैवाने आज रविवार असल्याने या रस्त्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला असून यामध्ये वेगावरील नियंत्रण सुटलेली कार काही अंतरावर थांबण्यापूर्वी फुटपाथवरील मुलांवर धडकताना दिसत आहे. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर काही जण वाहनातून बाहेर पडल्यावर चालकाला मारहाण करतानाही दिसतात. या अपघातात दोन मुले किरकोळ जखमी झाली तर तिसरा गंभीर परंतु स्थिर असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com