mangroves in goa Dainik Gomantak
ब्लॉग

Mangroves: आता गरज आहे डोळे उघडे ठेवून पावले उचलण्याची...

गोमन्तक डिजिटल टीम

Mangroves केळशी येथील साळ नदीच्या काठाला माझे रेस्टॉरंट आहे. ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात खारफुटीच्या (कांदळीच्या) बिया शेकडोच्या संख्येने नदीकाठाच्या आसपास विखरून पडलेल्या असतात. माझ्याकडे काम करणाऱ्या कामगारांच्या सहाय्‍याने मी त्या गोळा करून एखाद्या टोपलीत वगैरे ठेवतो.

या बियांना आपोआपच अंकुर फुटतात. अंकुर आलेल्या बियांना मी पुन्हा नदीच्या पात्रात माझ्या कामगारांच्या मदतीने रोवतो. त्यातून वाटलेल्या खारफुटींच्या झाडांचे आता छानसे बन बनले आहे. एकदा खारफुटीचे झाड रुजले की त्यांची संख्या द्विगुणित व्हायला वेळ लागत नाही. ही झाडेच आपोआप आपले क्षेत्र पसरवतात.

या खारफुटीच्या बनांनी अनेक प्रजातींना आपले घर दिले आहे. माशांची पैदास होण्यासाठी ही खारफुटींची बने मदत करतात. किनाऱ्यावर आपली वस्ती करून असलेल्या मच्छिमारासाठी परोक्ष-अपरोक्षपणे खारफुटींनी आदीम काळापासून मदत केली आहे.

नदीच्या किनाऱ्यांना या खारफुटीनी एका मर्यादेत बांधून घातले आहे. त्यामुळे आसपासच्या मानवी वस्तीला एक प्रकारचे खात्रीशीर संरक्षण लाभले आहे. काठावरचे बांधदेखील या खारफुटींमुळे दीर्घकाळ भक्कम उभे राहिले आहेत.

आज मात्र खाजगी पातळीवरच नव्हे तर अगदी शासकीय पातळीवरदेखील खारफुटीबद्दल अनास्था वाढताना दिसते आहे आणि त्यांचा विध्वंस करून त्याजागी अन्य योजना राबवण्याचा कावा स्पष्ट होताना दिसतो आहे.

अवजड यंत्रांच्या सहाय्याने ज्या प्रकारे अवैज्ञानिकरित्या नदीच्या पात्राचा उपसा केला जात आहे त्यातून खारफुटीचा नाश, काठावरच्या बांधाचे ढासळणे ठरलेलेच आहे. आपले पर्यावरण नष्ट करण्यासाठी सज्ज झालेली ही यंत्रणा फार शक्तिशाली आहे.

मी जे खारफुटींचे बन तयार केले आहे तो माझा लहानसा प्रयत्न आहे. आपल्या साऱ्यांना मिळून आपल्या नद्या वाचवायच्या आहेत. आर्थिक कारणांसाठी ही खारफुटी उद्ध्वस्त करायच्या प्रयत्नात अनेकजण आहेत.

विविध बळाने व कायद्याची कुठलीही पर्वा न करता त्यांच्या कारवाया चालूच असतील पण आपणही डोळे उघडे ठेवून पावले उचलली पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT