Bharatanatyam- Dance Form: प्रतिभासंपन्न अंकिता

भरतनाट्यममधील ‘कुशल ३’ ही पदवी तिने कला अकादमीमधून प्राप्त केली आहे.
Ankita Majik
Ankita MajikDainik Gomantak
Published on
Updated on

पद्माकर केळकर

सत्तरीतील अनेक भूमिपुत्रांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेव्दारे नाव कोरलेले आहे. अशीच एक केरी- सत्तरी गावची हरहुन्नरी कलाकार, अंकिता माजीक ही गोव्याची प्रतिभासंपन्न भरतनाट्यम कलाकार आहे. वयाच्या ७व्या वर्षी तिने भरतनाट्यमचे धडे घ्यायला सुरुवात केली.

भरतनाट्यममधील ‘कुशल ३’ ही पदवी तिने कला अकादमीमधून प्राप्त केली आहे. त्याच वर्षी झुवारीनगर येथील एम. ई. एस. कॉलेज महाविद्यालयातून कोंकणी या विषयात तिने पदवी मिळवली.

महाविद्यालयात ती प्रथम आली होती. त्यानंतर बंगलोर विद्यापिठातून भरतनाट्यम या विषयात पदव्युत्तर पातळीवर तिने ‘मास्टर इन प्रोग्रामींग आर्टस्’ पदवी संपादन केली.

Ankita Majik
Natural Disaster: सृष्टीचा आक्रोश आपल्‍याला कधी कळणार?

गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाची शिष्यवृत्ती तिला प्राप्त झाली आहे. नक्षत्र उत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव नुपूर नृत्य महोत्सव अनेक प्रतिष्ठेच्या नृत्य महोत्सवात अंकिताने भरतनाट्यम सादर केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर बंगलोर, हुबळी, मंगलोर, म्हैसूर अशा अनेक ठिकाणी खास निमंत्रित म्हणून तिने कला सादर केली आहे.

Ankita Majik
Horticultural Products: ‘नॉस्टाल्जिआ बनलेली ‘मल्लां’

विविध ठिकाणी नृत्य कार्यशाळा घेऊन अंकिता आपल्या शिष्यांना प्रशिक्षण देत असते. स्वत:च्या ‘भावप्रिया नृत्यालय’ या संस्थेत ती अनेक नवीन नृत्यांगना तयार करीत आहे.

सांस्कृतिक क्षेत्रात तिने केलेल्या कामामुळे ‘नॅशनल युथ आयकॉन-२०२३’ हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार तिला प्राप्त झाला आहे. सध्या अंकिता पेडणे येथील प्रगती महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com