World Watercolor Month: जागतिक जलरंग महिन्याच्या निमित्ताने...

गोव्यात ‘वॉटर कलर ऑर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ ही संस्था जलरंग माध्यमाच्या प्रसारासंबंधाने सातत्याने काम करत असते.
Watercolor
WatercolorDainik Gomantak
Published on
Updated on

Art २०१६ या सालापासून जुलै महिना जागतिक जलरंग महिना म्हणून साजरा होण्यास सुरुवात झाली. `जलरंग’ या माध्यमावर कोट्यवधी चित्रकार प्रेम करतात. या साऱ्यांसाठी जुलै महिना वेगळी प्रेरणा घेऊन येतो. जलरंग या माध्यमाविषयी जागृती करत असतानाच कला आणि प्रतिभा याविषयीच्या जाणिवाही या निमित्ताने बहरतात.

गोव्यात ‘वॉटर कलर ऑर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’ ही संस्था जलरंग माध्यमाच्या प्रसारासंबंधाने सातत्याने काम करत असते. जागतिक जलरंग महिन्याच्या निमित्ताने या संस्थेने जुलै महिन्यात जलरंग चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.

पहिल्या आठवड्यात ‘लॅण्डस्केप पेटिंग’, दुसऱ्या आठवड्यात ‘पोर्ट्रेट पेटिंग’, तिसऱ्या आठवड्यात ‘स्टील लाईफ पेंटिग’ तर चौथ्या आठवड्यात ‘सिटीस्केप पेटिंग’ अशा वेगवेगळ्या विभागात स्पर्धक चित्रकारांना आपली चित्रे सादर करायची होती.

Watercolor
Horticultural Products: ‘नॉस्टाल्जिआ बनलेली ‘मल्लां’

गोमंतकीय चित्रकारांसाठी मर्यादित असलेल्या या स्पर्धेत एकूण २० चित्रकारांनी भाग घेतला. ही स्पर्धा एकप्रकारे आव्हानात्मक अशीच होती त्यामुळे हे सारेच चित्रकार हा पूर्ण महिना जलरंगांमधून काम करण्यात व्यस्त राहिले. स्पर्धक चित्रकाराला प्रत्येक विभागात २ चित्रे याप्रमाणे एकूण ८ चित्रे सादर करणे बंधनकारक होते.

Watercolor
Bharatanatyam- Dance Form: प्रतिभासंपन्न अंकिता

रोहन माळगावकर यांनी रंगवलेल्या चित्राला या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. प्रसांथी चंदुरी यांच्या चित्राला द्वितीय तर दिलखुष गुरव यांच्या चित्राला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तुषार आमोणकर व शैलेश वेंगुर्लेकर यांच्या चित्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com