Top 15 Essential Skills For Professionals In India Dainik Gomantak
अर्थविश्व

कामात स्मार्ट राहण्यासाठी LinkedIn ने सुचवली 15 कौशल्‍ये; मुंबईतील टॉप जॉबची लिस्टही वाचा

Top 15 Essential Skills For Professionals In India: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने 'स्किल्‍स ऑन द राइज 2025' नावाने एक रिपोर्ट जारी केला आहे.

Manish Jadhav

Top15 Essential Skills India 2025 Linkedin Skills On The Rise

मुंबई: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने 'स्किल्‍स ऑन द राइज 2025' नावाने एक रिपोर्ट जारी केला आहे, ज्‍यामध्ये 15 कौशल्‍ये नमूद करण्यात आली आहेत. ही कौशल्ये प्रोफेशनल्‍सनी कामाच्‍या ठिकाणी प्रगती करण्यासोबत अपडेट राहण्यासाठी मदत करतात. खासकरुन भारतातील कंपन्‍या हायरिंग करताना ही 5 अव्वल कौशल्ये विचारात घेतात, जसे की,1. सर्जनशीलता नाविन्‍यता 2. एआय साक्षरता 3. समस्‍या निवारण 4. प्री-स्क्रिनिंग 5. धोरणात्‍मक विचारसरणी.

2023 पर्यंत 64 टक्‍के कौशल्‍यांमध्‍ये बदल होणार

दरम्यान, भारतातील बहुतांश रोजगारांमध्‍ये वापरण्‍यात येणाऱ्या 64 टक्‍के कौशल्‍यांमध्‍ये 2023 पर्यंत बदल होण्‍याची शक्यता आहे. लिंक्‍डइनच्या संशोधनानुसार, 25 टक्‍के प्रोफेशनल्‍स भविष्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये नसल्‍यामुळे चिंतित आहेत. मुंबईतील (Mumbai) 10 पैकी जवळपास 4 (45 टक्‍के) प्रोफेशनल्‍सना ते रोजगारासाठी योग्‍य असल्‍याचे निर्धारित करणे कठिण जात आहे. तर 28 टक्‍के प्रोफेशनल्‍सना त्‍यांची कोणती कौशल्‍ये रोजगारासाठी अनुकूल आहेत, पूर्वीपेक्षा कोणत्‍या कौशल्‍यांना अधिक मागणी आहे हे माहित नाही. दुसरीकडे, भारतातील 69 टक्‍के रिक्रूटर्स प्रोफेशनल्‍समध्‍ये असलेली कौशल्‍ये आणि कंपन्‍यांना आवश्‍यक असलेली कौशल्‍ये यामध्‍ये तफावत असल्‍याचे सांगतात.

मूलभूत कौशल्य आवश्यक

लिंक्‍डइनच्‍या करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादक निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee) यांनी सांगितले की, ''इंडिया इन्‍क.मध्‍ये मूलभूत कौशल्यात बदल दिसून येत आहेत. एआय आपल्‍या काम करण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करत असताना सर्जनशीलता, समस्‍या निवारण आणि धोरणात्‍मक विचारसरणी यांसारखी सॉफ्ट कौशल्‍ये 'आत्‍मसात करणे' गरजेचे असण्‍यासोबत व्‍यवसायासाठी महत्त्वाचे बनली आहेत.

यासोबतच, एआय साक्षरता सर्व रोजगार (Employment) कार्यांसाठी क्रमप्राप्त ठरत आहे. नियोक्‍ते देखील ग्राहक सहभाग आणि भागधारक व्‍यवस्‍थापन वाढवत आहेत, ज्‍यामुळे व्‍यवसाय क्षमता पूर्वीपेक्षा अधिक बहुमूल्‍य बनली आहे. यंदाची स्किल्‍स ऑन द राइज लिस्‍ट प्रोफेशनल्‍ससाठी आवश्‍यक संसाधन आहे, ज्‍यामुळे त्‍यांना 2025 मध्‍ये कंपन्‍या हायरिंगच्‍या वेळी प्राधान्‍य देत असलेली कौशल्‍ये ओळखण्‍यास आणि अवगत करण्‍यास मदत होईल.''

सॉफ्ट स्किल्‍सला अधिक प्राधान्‍य

आर्टस् अँड डिझाइन व मार्केटिंग यांसारख्‍या समकालीन सर्जनशील क्षेत्रांमध्‍ये, तसेच व्‍यवसाय विकास आणि शिक्षणामध्‍ये देखील सर्जनशीलता आणि नाविन्‍यता, समस्‍या निवारण, आणि धोरणात्‍मक विचारसरणी या कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. त्‍याचप्रमाणे, सेल्‍स आणि एचआर यांसारख्‍या कर्मचारी-केंद्रित पदांव्‍यतिरिक्‍त कम्‍युनिकेशन कौशल्‍य गरजेची बनली आहेत, ज्‍याला आयटी, कन्‍सल्टिंग आणि फायनान्‍समध्‍ये प्राधान्‍य दिले जात आहे.

एआय साक्षरता

आजच्‍या कामाच्‍या लँडस्‍केपमध्‍ये एआयसह काम करण्‍याची क्षमता महत्त्वाची बनली आहे. भारतातील 95 टक्‍के सी-सूट प्रमुख समकालीन अनुभवाच्‍या तुलनेत एआय कौशल्यांना प्राधान्‍य देत आहेत. लार्ज लँग्‍वेज मॉडेल्‍स (एलएलएम), एआय साक्षरता आणि प्रॉम्‍प्‍ट इंजीनिअरिंग कौशल्‍ये रोजगार अर्जदारांसाठी प्रमुख डिफरेन्शिएटर्स ठरत आहेत. पारंपारिकरित्‍या ही कौशल्‍ये आयटीशी संलग्‍न असली तरी शिक्षण आणि मार्केटिंगमधील त्‍यांच्‍या वाढत्‍या प्रासंगिकतेमधून रोजगार कार्यांमध्‍ये एआय आणि टेक फ्लूइन्‍सीची वाढती भूमिका दिसून येते.

कौशल्‍यांना अधिक मागणी

कंपन्‍या व्‍यवसाय विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असताना प्रबळ ग्राहक संबंधाला अधिक प्राधान्‍य देत आहेत. ग्राहक सहभाग हे महत्त्वपूर्ण कौशल्‍य आहे, जिथे सेल्‍स, बिझनेस डेव्‍हलपमेंट आणि मार्केटिंग कार्यांमध्‍ये ग्राहक समाधानावर अधिक भर दिला जातो. व्‍यवसायांना कायमस्वरुपी ग्राहक संबंध आणि निष्‍ठा निर्माण करण्‍यास मदत करु शकणाऱ्या प्रोफेशनल्‍संना याचा फायदा होईल.

नवीन रोजगाराचा शोध

लिंक्‍डइनच्‍या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील 82 टक्‍के प्रोफेशनल्‍स या वर्षात नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत. पण, शहरातील 46 टक्‍के प्रोफेशनल्‍स सांगतात की, ते अधिक रोजगारांसाठी अर्ज करत आहेत, परंतु त्या तुलनेत फिटबॅक कमी मिळत आहे. हेच लक्षात घेऊन प्रोफेशनल्‍संना योग्‍य संधींसंदर्भात मार्गदर्शन करण्‍यासाठी लिंक्‍डइनने आपल्‍या वार्षिक जॉब्‍स ऑन द राइज लिस्‍टचे अनावरण केले आहे, ज्‍यामधून गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढत असलेल्‍या रोजगाराबाबत माहिती मिळते.

या वर्षातील भारतामधील टॉप 15 स्किल्‍स ऑन द राइज:

1. सर्जनशीलता आणि नाविन्‍यता

2. कोडिंग

3. समस्‍या निवारण

4. प्री-स्क्रिनिंग

5. धोरणात्‍मक विचारसरणी

6. कम्‍युनिकेशन

7. अनुकूलला (जुळवून घेण्‍याची क्षमता)

8. लार्ज लँग्‍वेज मॉडेल्‍स (एलएलएएम)

9. एआय साक्षरता

10. डिबगिंग

11. ग्राहक सहभाग

12. सांख्यिकीय डेटा विश्‍लेषण

13. प्रॉम्‍प्‍ट इंजीनिअरिंग

14. मार्केट विश्‍लेषण

15. भागधारक व्‍यवस्‍थापन

मुंबईतील जॉब्‍स ऑन द राइजची संपूर्ण लिस्‍ट:

1. इलेक्ट्रिकल डिझाइनर

2. ट्रॅव्‍हल एक्झिक्‍युटिव्‍ह

3. कॉन्‍फरन्‍स प्रॉड्युसर

4. हेड ऑफ इंटर्नल ऑडिट

5. कॉन्‍ट्रॅक्‍ट स्‍पेशालिस्‍ट

6. क्रिएटिव्‍ह स्‍ट्रॅटेजिस्‍ट

7. मेकॅनिकल इंजीनिअरिंग मॅनेजर

8. क्‍लोजिंग मॅनेजर

9. व्हिडिओग्राफर

10. गेस्‍ट रिलेशन्‍स मॅनेजर

लिंक्‍डइनच्‍या करिअर एक्‍स्‍पर्ट निरजिता बॅनर्जी यांनी प्रोफेशनल्‍संना नवीन संधी अनलॉक करण्‍यास मदत करण्‍यासाठी खालील टिप्‍स सांगितल्या आहेत...

विविध कौशल्‍ये अवगत करा

विविध कौशल्‍ये आत्‍मसात करण्‍यासाठी तुमच्‍या जॉब हिस्‍ट्रीचे पुनरावलोकन करा. व्‍हॉल्‍यून्टिअरिंग, स्‍पोर्टस् क्‍लब्‍स यांसह इतर अनुभवांमधून मिळालेल्‍या कौशल्‍यांचा विचार करण्‍यास विसरु नका, यामुळे तुम्‍ही केलेल्‍या विचारापेक्षा अधिक कौशल्‍ये आत्‍मसात होतील. तसेच, यामुळे तुम्‍हाला रोजगार शोधताना तुमचे आयडी स्किल्‍स दाखवण्‍यास मदत होईल आणि भविष्‍यात आत्‍मसात करण्‍याची गरज असलेली कौशल्‍ये ओळखण्‍यास मदत होऊ शकते.

सॉफ्ट स्किल्‍स दाखवा

अनेक रोजगारांसाठी टेक्निकल कौशल्‍ये आवश्‍यक असली तरी कम्‍युनिकेशन आणि अनुकूलता (जुळवून घेण्‍याची क्षमता) यांसारख्‍या कौशल्‍यांना मागणी आहे. ही कौशल्य असणाऱ्यांना उद्योगांमध्‍ये अधिक प्राधान्‍य दिले जात आहे. ही कौशल्‍ये नियोक्‍त्‍यांसाठी महत्त्वाची आहेत, ज्‍यामुळे तुमच्‍यामध्‍ये असलेली ही कौशल्‍ये दडवून ठेवू नका. पाच किंवा त्याहून अधिक कौशल्ये सूचीबद्ध करणारे सदस्य रिक्रूटर्सकडून 5.6 पट जास्त प्रोफाइल व्ह्यूज आणि रिक्रूटर इनमेल्सकडून 24 पट जास्त प्रोफाइल व्ह्यूज मिळवतात. तसेच, त्यांना कनेक्शन रिक्‍वेस्ट मिळण्याची शक्यता 2.9 पट जास्त असते. तुमच्या प्रोफाइलमध्ये तुमच्‍यामध्‍ये असलेली कौशल्‍ये नमूद करा.

मोफत कोर्सेस

प्रोफेशनल्‍संना मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन लर्निंग मोफत कोर्सेस देत आहे, ज्‍यामुळे त्‍यांना ही आवश्‍यक कौशल्‍ये अवगत करण्‍यास मदत होईल. तसेच, लिंक्‍डइनचे नवीन एआय-पॉवर्ड कोचिंग वैशिष्‍ट्य (new AI-Powered Coaching Feature) लर्नर्संना वास्‍तविक कामाच्‍या ठिकाणी होणारे संवाद जसे कामगिरीचे पुनरावलोकन आणि अभिप्रायाबाबत चर्चा यासंदर्भात मजकूर किंवा आवाजाचा उपयोग करत सराव करण्‍यास सक्षम करते. याव्‍यतिरिक्‍त आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी वैयक्तिकृत अभिप्राय देखील देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

SCROLL FOR NEXT