Manish Jadhav
टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची रेड डार्क एडिशन लॉन्च केली आहे.
टाटा मोटर्सच्या मते, नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा चार्ज केल्यावर 489 किमी पर्यंत धावू शकते. याशिवाय, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एसी चार्जरने फक्त 40 मिनिटांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
जर तुम्ही लवकरच नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या रेड डार्क एडिशनबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
आज (18 जानेवारी) आम्ही तुम्हाला या वेबस्टोरीच्या माध्यमातून नेक्सॉन ईव्हीच्या रेड डार्क एडिशनबद्दल डिटेल्स देणार आहोत.
नेक्सॉन ईव्हीच्या रेड डार्क एडिशनमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. या कारचा एक्सटीरियर पेंट कार्बन ब्लॅक शेडमध्ये देण्यात आला आहे.
या कारच्या फ्रंटला पियानो ब्लॅक ग्रिल बसवण्यात आली आहे, ज्यावर टाटाचा लोगो आणखी डार्क करण्यात आला आहे. टाटाच्या या इलेक्ट्रिक कारचे इंटीरियर रेड शेडमध्ये देण्यात आले आहे. कारवरील पॅनोरॅमिक सनरुफ आणि फ्रंट देखील बदलण्यात आले आहेत.
नेक्सॉन ईव्हीच्या या एम्पॉवर्ड+ 45 रेड डार्क एडिशनची किंमत 17.19 लाख रुपये एवढी आहे.