
Tata EV Sets Fastest Kashmir to Kanyakumari Drive Record in 76 Hours
कन्याकुमारी: भारताचे सर्वात मोठे 4-व्हीलर उत्पादक आणि भारतातील EV क्रांतीचे प्रणेते TATA.ev यांनी आज (3 मार्च, 2025) काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर अवघ्या 76 तास आणि 35 मिनिटांत कापून सर्वात जलद EV ड्राइव्हचा विक्रम नोंदला. (यापूर्वीच्या Nexon EV MAX च्या विक्रमापेक्षा तब्बल 19 तासांहून कमी वेळात) या ड्राइव्हचे नेतृत्त्व त्यांच्या SUV कूपे Curvv.ev ने केले. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचे 3800 किमी. चे अंतर सर्वात जलद पार करण्याबरोबरच Curvv.ev ने यशस्वीरित्या 20 राष्ट्रीय विक्रम देखील स्थापित केले.
दरम्यान, हा लक्षणीय प्रवास पूर्ण करताना Curvv.ev ने फक्त 16 चार्जिंग स्टॉप घेतले. यावेळी चार्जिंगची सरासरी वेळ 28 तासांच्या ऐवजी कमी होऊन 17 तास झाली. यामधून बॅटरी टेक्नॉलॉजीची प्रगती दिसून येते तसेच देशभरात सार्वजनिक चार्जिंग नेटवर्क पसरले असल्याची ग्वाही देखील मिळते. या चार्जिंग नेटवर्कमधील महामार्गालगतचे बहुतांशी चार्जिंग पॉइंट आता जलद चार्जिंग स्पीडचे समर्थन करणारे आहेत.
Curvv.ev च्या प्रवासाची यथासांग सुरुवात श्रीनगर येथे जम्मू आणि काश्मीरचे (Jammu Kashmir) माननीय मुख्य मंत्री श्री. ओमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या फ्लॅग ऑफने झाली. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 4 वाजता हा प्रवास सुरु झाला. TATA.ev चे प्रमुख उत्पादन असलेल्या या EV ने विविध प्रकारच्या हवामान स्थितीतून वाट काढत, विविध प्रकारच्या प्रांतांतून आणि भारतातील सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कच्या मदतीने 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8:35 वाजता कन्याकुमारीचे गंतव्य स्थान गाठले. कन्याकुमारीतील खासदार श्री. विजय वसंत यांनी कन्याकुमारीत या विक्रमी राईडचे स्वागत केले.
या रोमांचक मोहिमेविषयी बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “मोठे प्रवास देखील EV च्या सोबतीने किती सहज, सक्षमतेने आणि आरामदायक पद्धतीने होऊ शकतात हे दाखवण्यासाठी आम्ही हा रोमांचक नॉन-स्टॉप प्रवास योजला होता. दररोज अंदाजे 1200 किमी. अंतर कापण्याच्या इराद्याने, नावीन्यपूर्ण acti.ev प्योर EV आर्किटेक्चर आणि 55 kWh बॅटरीने सुसज्ज अशा Curvv.ev ने हे टिकाऊपणाचे आव्हान सहज पेलले आणि चालकांना थकवा-मुक्त अनुभव दिला.
सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता 18000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स आहेत. या विक्रमी प्रवासात Curvv.ev ज्या 10 राज्यांतून आणि केंद्रशासित प्रदेशातून पसार झाली, त्यातील प्रत्येक जिल्हा फास्ट चार्जर्सनी सळसळला होता. या व्यतिरिक्त, झपाट्याने वाढत चाललेल्या हाय-स्पीड चार्जिंग नेटवर्क आणि स्मूद महामार्गांचा देखील Curvv.ev च्या राईडला फायदा झाला.
या लक्षणीय सिद्धीमधून हे सिद्ध झाले की, टाटा EV एखाद्या ICE-संचालित वाहनापेक्षा उणी नाही आणि इतका मोठा प्रवास देखील ही गाडी यशस्वीरित्या पूर्ण करू शकते. आम्हाला विश्वास आहे की, Curvv.ev ची ही उत्कृष्ट कामगिरी संभाव्य ग्राहकांमध्ये EV खरेदी करून शून्य उत्सर्जन करणारी गतिशीलता अंगिकारण्याबाबतचा विश्वास वाढवेल आणि त्याच बरोबर EV मालकांना गर्वाची अनुभूती देईल.”
1) या आधीच्या रेकॉर्ड रन नंतरच्या काळात भारताच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप सुधारणा झाली आहे. 2023 मध्ये Nexon.ev साठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची मोजणी करताना सर्वात इष्टतम मार्ग 4004 किमी. चा होता. यावेळेच्या विक्रमी राईडमध्ये Curvv.ev साठी हे अंतर कमी होऊन 3823 किमी. झाले होते कारण चार्जर शोधण्यासाठी फारशी आडवाट करण्याची वेळ आली नाही. चार्जर्सच्या वाढलेल्या संख्येमुळे ICE आणि EV यांना इष्टतम अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेतला फरक बराच कमी झाला आहे. त्यामुळे लांबवरचे प्रवास EV साठी जवळजवळ तितकेच सोपे झाले आहेत.
2) वर्तमान 18,000 चार्जर्स सह, भारताच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2023 च्या तुलनेत 227% सुधारणा झाली आहे. विशेषतः जलद हाय-पॉवर्ड 60-120 kW चार्जर्स सामील झाले आहेत.
3) देशभरात 85% महामार्गांवर दर 50 किमी. वर एक फास्ट चार्जर आहे.
4) iRA.ev अॅपच्या चार्ज पॉइंट अॅग्रिगेटर द्वारा ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला बनवण्यात आला आहे. हे अॅप 12,000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट्सना मॅप करते आणि कुशल रूट प्लॅनिंग बरोबरच वाहनाची माहिती देखील देते. या व्यतिरिक्त, .ev व्हेरिफाईड चार्जर प्रोग्राममुळे दूरवरचे प्रवास पाहिल्यापेक्षा जास्त पूर्वानुमानित झाले आहेत. हा प्रोग्राम विश्वसनीय चार्जिंग, मूलभूत सुविधांची उपलब्धता आणि मोक्याच्या स्थानाच्या आधारे प्रत्येक चार्जरचे रेटिंग करतो.
5) TATA.ev युनिफाईड RFID कार्डने EV मध्ये चार्जिंग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या CPOs मधून वेगवेगळ्या अॅप्लिकेशन अॅक्सेस करण्यासाठी इंटरनेटवर विसंबून न राहता, सोय वाढवली आहे.
Curvv.ev चा यशस्वी K2K रन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वर्धित रेंज प्रदान करून भारताच्या EV ईकोसिस्टमला पुढे नेण्याबाबत TATA.ev च्या वचनबद्धतेस बळकट करतो. भारताची पहिली SUV कूपे तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स (Tata Motors) डीलरकडे किंवा TATA.ev स्टोअर मध्ये 17.49 लाख रु. पासून सुरू होणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.