Iphone New Feature Dainik Gomantak
अर्थविश्व

Iphone New Feature: 'हे' नवं फीचर आयफोनला बनवतंय हेल्थ गार्ड, वापरकर्त्यांना एकाच फीचरमध्ये मिळणार 6 जबरदस्त फायदे!

Apple Health Plus Launch 2026: कंपनीने त्यांच्या हेल्थ कोच प्रोजेक्ट मुलबेरीची घोषणा केली. 'हेल्थ प्लस' नावाचा हा प्रोजेक्ट वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइस डेटाच्या आधारे पर्सनल हेल्थ काउंससिलिंग, मेडिकेशन आणि ट्रीटमेंट सर्व्हिस देईल.

Manish Jadhav

Apple Project Mulberry Health Plus Personalized Wellness 2026

आयफोन बनवणारी टेक कंपनी अ‍ॅपल आता हेल्थ सेक्टरमध्ये एन्ट्री करणार आहे. होय हे ऐकून चकित झालात ना... अलीकडेच, कंपनीने त्यांच्या हेल्थ कोच प्रोजेक्ट मुलबेरीची घोषणा केली. 'हेल्थ प्लस' नावाचा हा प्रोजेक्ट वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइस डेटाच्या आधारे पर्सनल हेल्थ काउंससिलिंग, मेडिकेशन आणि ट्रीटमेंट सर्व्हिस देईल.

याशिवाय, वापरकर्त्यांच्या हृदयाचे ठोके, झोपेचा पॅटर्न आणि कॅलरी बर्न यासारख्या डेटाचे विश्लेषण देखील करेल. प्रोजेक्ट मुलबेरी जून 2026 च्या आसपास सुरु होऊ शकतो. चला तर मग मुलबेरी हेल्थ प्लस प्रोजेक्ट नेमका काय आहे? त्याचे काय फायदे आहेत? आणि विशेष म्हणजे यामुळे काय आव्हान निर्माण होऊ शकते? याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...

काय फायदा होणार?

1. जर तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल तर हेल्थ प्लस (Health Plus) तुम्हाला 7-8 तास झोपण्यास प्रोत्साहित करेल.

2. जर हृदयाच्या ठोक्यातून तणावाचे संकेत मिळत असतील, तर हेल्थ प्लस तुम्हाला ध्यान करण्यास किंवा विश्रांती घेण्यास सूचित करेल.

3. जर एखाद्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात गेली असेल तर ते गोड पदार्थ सोडून देण्यास तुम्हाला सांगेल.

4. याशिवाय, वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास देखील हेल्थ प्लस मदत करेल.

5. हेल्थ प्लस फूड इटिंग ट्रॅकिंग फीचर असेल, जे वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्यानुसार आहार सुचवेल.

6. हेल्थ प्लस हेल्थ मॅनेजमेंट सोपे आणि स्वस्त बनवू शकते, परंतु गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा (Doctor) सल्ला आवश्यक आहे.

टेक्नोलॉजी

हेल्थ प्लसची टेक्नोलॉजी (Technology) मशीन लर्निंगवर आधारित आहे. यामध्ये झोप, पोषण, शारीरिक, वैद्यकीय, मानसिक आरोग्य तसेच हृदयरोग तज्ञांचा सल्ला देखील समावेश आहे. या अ‍ॅपमध्ये कम्प्युटर बेस्ड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

आव्हान आणि वाद काय आहे?

तज्ञांच्या मते, एआय बेस्ड सल्ल्याची अचूकता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या सल्ल्यांमुळे नुकसान होऊ शकते. यासोबतच, गोपनीयता (Privacy) हा देखील एक मोठा मुद्दा आहे, कारण हेल्थ डेटा खूप संवेदनशील आहे. अ‍ॅपलला त्यांच्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता सुनिश्चित करावी लागेल. विशेषतः जेव्हा ते सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित असेल. तज्ञांनी चिंता व्यक्त केली की, वापरकर्ते या टेक्नॉलॉजीवर जास्त विसंबून राहण्याची शक्यता जास्त आहे, ज्यामुळे ते वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT