Sameer Amunekar
स्वस्त आयफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण ॲपल पुढील आठवड्यात या वर्षाचा पहिला आयफोन लॉंच करण्याची शक्यता आहे.
ॲपल पुढील आठवड्यात iPhone SE 4 लाँच करण्याची योजना आखत आहे. हा फोन 2022 मध्ये लाँच झालेल्या iPhone SE 3 ची आवृती असेल.
iPhone SE 4च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले जातील. आयफोन एसई 3 मध्ये टच आयडी आणि 4.7-इंच डिस्प्ले होता, या आयफोनमध्ये आधुनिक डिझाइन पाहायला मिळेल.
Apple यावेळी iPhone SE 4 मध्ये फेस आयडीसाठी सपोर्ट देऊ शकते. त्यात डायनॅमिक आयलंड फीचर दिले जाणार नाही, त्याऐवजी आयफोन 13 आणि आयफोन 14 सारख्या नॉच डिझाइनसह येईल.
Apple यात A18 चिपसेट देऊ शकते, जो 8GB रॅमसह जोडला जाईल. याचं स्टोरेज 128 जीबी असण्याची अपेक्षा आहे.
iPhone SE 4 साठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. iPhone SE ३3 हा 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. iPhone SE 4 ची सुरुवातीची किंमत 49,900 रुपये असू शकते.