Fake IPhones Goa: म्हापसा बाजारात 3 लाखांच्या बनावट आयफोन अ‍ॅक्सेसरीज जप्त, दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल

Fake iPhone Accessories Mapusa: गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेनं गुरूवारी (२७ मार्च) मोठी कारवाई करत म्हापसा बाजारपेठेतील चार मोबाईल विक्री दुकांनांवर छापा टाकला.
Fake iPhone Accessories Mapusa
Fake iPhone Accessories MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Branch: गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेनं गुरूवारी (२७ मार्च) मोठी कारवाई करत म्हापसा बाजारपेठेतील चार मोबाईल विक्री दुकांनांवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ३ लाख रुपयांच्या बनावट आयफोन अक्सेसरीज जप्त करण्यात आल्या. ही कारवाई आयफोन कंपनीच्या भारतीय प्रतिनिधी महमद ताकीर यांच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली.

पोलिसांनी ही कारवाई आयफोन कंपनीचे भारतीय प्रतिनिधी महमद ताकीर यांच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली. आयफोन कंपनीला माहिती मिळाली होती की, म्हापसा मार्केटमधील काही दुकानं आयफोनची बनावट अक्सेसरीज विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

Fake iPhone Accessories Mapusa
Women Safety In Goa: गोवा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित! मुख्यमंत्री ठाम, भाडेकरू पडताळणीमुळे गुन्हेगारांवर वचक बसल्याचा दावा

म्हापसा बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये बनावट आयफोन अक्सेसरीस विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. कंपनीच्या तक्रारीनंतर गोवा गुन्हा शाखेच्या पथकानं या दुकानांवर पाळत ठेवली आणि धडक कारवाई केली.

Fake iPhone Accessories Mapusa
Goa Private School Fees: गतवर्षी राज्यातील विनाअनुदानित 6 शाळांकडून शुल्कवाढ नाही! 1 लाखाहून अधिक शुल्क आकारणाऱ्या 3 शाळा

पोलिसांनी तातडीने कारवाई करत जान्हवी कॉर्नर, सुपर टेलिकॉम आणि कृष्णा मोबाईल्स या मोबाईल अक्सेसरीज विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, पोलिसांनी बनावट चार्जर, केबल्स, इअरपॉड्स, बॅटऱ्या आणि इतर अक्सेसरीज जप्त केल्या. जप्त केलेल्या एकूण वस्तूंची किंमत जवळपास ३ लाख रुपये आहे.

पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेच्या विशेष पथकानं हि कारवाई केली. पोलिसांनी संबधित दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून या बनावट अक्सेसरीजचा पुरवठा कुठून केला जात होता, याचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com