भारतात अॅपलच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपची मागणी झपाट्याने वाढत आहे. खासकरुन मीड आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये आयफोनची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हेच लक्षात घेता अॅपल आता भारतात त्यांच्या उत्पादनांच्या दुरुस्तीला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ईटीच्या अहवालानुसार, अॅपलने त्यांच्या वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत आयफोन आणि मॅकबुक उपकरणांच्या दुरुस्तीचे काम टाटा ग्रुपकडे सोपवले आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा करार झाला आहे.
सध्या अॅपल आयफोन बनवण्यासाठी चीनऐवजी भारतावर लक्ष केंद्रीत करत आहे. तर दुसरीकडे, टाटा वेगाने त्यांचा प्रमुख पुरवठादार म्हणून उदयास आला. टाटा आधीच दक्षिण भारतातील (India) तीन फीचर्समध्ये स्थानिक आणि परदेशी बाजारपेठांसाठी आयफोन असेंबल करत आहे. त्यापैकी एका फीचर्समध्ये आयफोनचे काही भाग देखील बनवले जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या करारात टाटा तैवानच्या विस्ट्रॉन कंपनीच्या भारतीय यूनिट आईसीटी सर्व्हिसचे मॅनेजमेंटही पाहणार आहे. सेलनंतर कंपनी त्यांच्या कर्नाटकातील आयफोन असेंबली कॉम्प्लेक्समधून दुरुस्तीचे काम सुरु करेल.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन (Smartphone) बाजारपेठ असलेल्या भारतात रिपेयरिंगची बाजारपेठही वेगान वाढणार आहे. कारण आयफोनची विक्री गगनाला भिडत आहे. काउंटरपॉइंट रिसर्चचा अंदाज आहे की, गेल्या वर्षी भारतात सुमारे 1.1 कोटी आयफोन विकले गेले होते, ज्यामुळे अॅपलचा बाजारातील वाटा 7 टक्क्यांपर्यंत वाढला, जो 2020 मध्ये केवळ 1 टक्के होता.
दरम्यान, नवीन करारामुळे अॅपलचा जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन निर्माता म्हणून टाटावरील वाढता विश्वास दिसून येतो. "अॅपलसोबत टाटाची वाढती भागीदारी अॅपलला भारतात थेट नूतनीकरण केलेल्या उपकरणांची विक्री करण्यासाठी पाया घालू शकते. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या टॅरिफदरम्यान भारत आयफोन निर्यातीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येत आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की, जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतीय कारखान्यांमध्ये बनवले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.