Tata Punch: नेक्सॉनपेक्षा 2 लाखांनी स्वस्त असणारी 'टाटा पंच' बनली नंबर 1, ब्रेझालाही सोडले मागे; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरचं काही

Tata Punch Features And Specs: भारतात एसयूव्हीच्या वाढत्या विक्रीमुळे आता छोट्या हॅचबॅक कारची मागणी कमी झाली असून सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
Tata Punch Features And Specs
Tata PunchDainik Gomatak
Published on
Updated on

भारतात एसयूव्हीच्या वाढत्या विक्रीमुळे आता छोट्या हॅचबॅक कारची मागणी कमी झाली असून सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त एसयूव्हींपैकी एका एसयूव्हीने इतर सर्व कार्संना मागे सोडले आहे. या एसयूव्हीचे नाव टाटा पंच आहे. गेल्या आर्थिक वर्षात पंच ही सर्वाधिक विक्री होणारी सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. या सेगमेंटमध्ये ब्रेझापासून ते नेक्सॉनपर्यंत सर्वांना मागे सोडले आहे.

दरम्यान, टाटा पंच पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तिन्ही मॉडेल्समध्ये येते. गेल्या आर्थिक वर्षात पंच ही तिच्या श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे. गेल्या आर्थिक वर्षात टाटाने 1,96,572 युनिट्स विकल्या. पंच नंतर मारुती सुझुकी ब्रेझा येते, ज्यापैकी मारुती सुझुकीने 1,89,163 युनिट्स विकल्या. ब्रेझानंतर फ्रँक्सचा क्रमांक लागतो, जिच्या 1,66,216 युनिट्स विकल्या.

Tata Punch Features And Specs
Hyundai Exter Vs Tata Punch: CNG कार घ्यायची आहे? टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टरमध्ये कोणती बेस्ट? जाणून घ्या मायलेज, फीचर्स आणि किंमत

टाटा नेक्सन चौथ्या क्रमांकावर

यानंतर टाटा नेक्सॉन येते, जी या यादीत टाटाची दुसरी कार आहे. नेक्सॉन टाटा मोटर्ससाठी एक मोठे यश ठरली. ही एसयूव्ही पेट्रोल, डिझेल, सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक या तिन्ही मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. टाटाने नेक्सॉनच्या एकूण 1,63,088 युनिट्सची विक्री केली. यादीतील पाचवी एसयूव्ही ह्युंदाई व्हेन्यू आहे. ह्युंदाईने आर्थिक वर्ष 25 मध्ये 1,19,113 युनिट्स विकल्या.

Tata Punch Features And Specs
Tata Punch Flex Fuel: 100 टक्के इथेनॉलवर धावणारी टाटाची 'पंच' येतेय; किंमत, फिचर्स जाणून घ्या

अफलातून फीचर्स

पंच ही या यादीतील सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे, जिची दिल्लीतील एक्स-शोरुम 6.20 लाख आहे. पंच क्लासिक लूक आणि फाईव्ह-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. या शानदार कारमध्ये 5 लोक बसू शकतात. पंचच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 10.25-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल कीलेस एंट्री, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स आणि रिअर एसी व्हेंट सारखी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, ही 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली सर्वात किफायतशीर कार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com