Tata Altroz: टाटा करणार मोठा धमाका! 2 CNG सिलेंडरसह लॉन्च करणार शानदार कार; स्विफ्ट आणि ब्रेझाला देणार टक्कर

Tata Altroz CNG 2025 Updates: मे महिन्यातील 21 तारखेला मोठा धमाका होणार आहे. या दिवशी 2 सीएनजी सिलेंडर असलेल्या प्रीमियम हॅचबॅक कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होणार आहेत.
Tata Altroz CNG 2025 Updates
Tata AltrozDainik Gomantak
Published on
Updated on

मे महिन्यातील 21 तारखेला मोठा धमाका होणार आहे. या दिवशी 2 सीएनजी सिलेंडर असलेल्या प्रीमियम हॅचबॅक कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च होणार आहेत. ही कार दुसरी तिसरी कोणती नसून टाटा अल्ट्रोज आहे, जिच्या अपडेटची बऱ्याच काळापासून कारप्रेमी वाट पाहत आहेत. ही कार 21 मे रोजी लॉन्च होत आहे. चला तर मग या शानदार कारमध्ये काय खास असणार आहे ते जाणून घेऊया...

टाटा मोटर्स या प्रीमियम हॅचबॅकच्या फक्त सीएनजी मॉडेलचे फेसलिफ्ट व्हर्जन आणत नाही. त्याऐवजी, तुम्हाला अल्ट्रोज आयटर्बो आणि अल्ट्रोज रेसर मॉडेल्समध्येही बदल दिसतील. ही कार 2020 मध्ये भारतात (India) पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती.

Tata Altroz CNG 2025 Updates
Tata Car: टाटाच्या 'या' कारवर मिळतेय तब्बल 'इतक्या' लाखांची सूट! जाणून घ्या अफलातून फिचर्स, मायलेज अन् बरचं काही

2 सीएनजी सिलेंडर टेक्नॉलॉजी

टाटा मोटर्सने सीएनजी (CNG) कारसाठी एक खास टेक्नॉलॉजी विकसित केले आहे. कंपनीने त्यास आयसीएनजी नाव दिले. ही टेक्नॉलॉजी जवळजवळ सर्व सीएनजी कारमध्ये वापरली गेली आहे. या टेक्नॉलॉजीची खास गोष्ट म्हणजे एका मोठ्या सिलेंडरऐवजी दोन लहान सीएनजी सिलेंडर वापरले जातात. यामुळे कारच्या बूट स्पेसवर परिणाम होत नाही आणि सीएनजी सिलेंडर असूनही कारमध्ये पुरेसे स्टोरेज मिळते. इतकेच नाहीतर या टेक्नॉलॉजीच्या मदतीने कंपनीने लीकेज डिटेक्शन सिस्टिम देखील विकसित केली आहे. गाडीतील सीएनजी टाकी किंवा पाईपमध्ये लीकेज असल्यास, ही टेक्नॉलॉजीची ते शोधते आणि सीएनजी पुरवठा थांबवते. अशाप्रकारे कारची सुरक्षितता वाढते.

नवीन अल्ट्रोजमध्ये काय असणार नवीन?

नवीन टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये मॅकेनकली फारसे बदल होणार नाहीत, तथापि, तिच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये बरेच बदल दिसून येतील. या कारचा फ्रंट भाग पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला या अपडेटमध्ये नवीन ग्रिल, ट्विन एलईडी हेडलॅम्प मिळू शकतात. हे नवीन नेक्सॉन, कर्व्ह आणि हॅरियरसारखे असू शकतात.

टाटा मोटर्सने या नवीन कारचे फ्रंट, बंपर आणि एरोडायनामिक्स सुधारणा केली आहे. कारच्या अनेक स्पाय शॉट समोर आले आहेत. नवीन व्हेरिएंटच्या फॉग लॅम्प्स व्यतिरिक्त, नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स आणि अधिक आकर्षक डीआरएल कारमध्ये मिळू शकतात. कंपनी तिच्या टेल लाईटमध्येही बदल करण्यावर काम करत आहे.

Tata Altroz CNG 2025 Updates
Tata Tiago vs Maruti Suzuki Swift: अपडेटेड टाटा टियागो Vs मारुती स्विफ्ट; फीचर्स, मायलेज आणि किंमतमध्ये कोण भारी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंटीरियर आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कारमध्ये कॅमेरा-आधारित ADAS असू शकते. तसेच, क्लायमेट कंट्रोल, 10.2-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अँबियन्स लाइटिंग आणि पॉवर ड्रायव्हर सीटसारखे पर्याय देखील उपलब्ध असू शकतात. 10 लाखांपेक्षा कमी किंमत असलेली ही कार मार्केटमध्ये थेट मारुती स्विफ्ट आणि ब्रेझाशी स्पर्धा करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com